Home /News /news /

आमिर खाननं मागितली IPL मध्ये संधी, रवी शास्त्रींच्या उत्तरानं झाला निराश, पाहा VIDEO

आमिर खाननं मागितली IPL मध्ये संधी, रवी शास्त्रींच्या उत्तरानं झाला निराश, पाहा VIDEO

आमिर खानचा (Aamir Khan) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं आयपीएल टीममध्ये संधी देण्याची मागणी केली होती. त्याला रवी शास्त्रींनी दिलेल्या उत्तरानं आमिर निराश झाला आहे.

    मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. प्रत्येक मॅचनंतर स्पर्धेतील रंगत वाढत चाललीय. सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींमध्ये क्रिकेटचा फिव्हर आहे. अभिनेता आमिर खान (Aamir Khan) देखील त्याला अपवाद नाही. आमिरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं आयपीएल टीममध्ये संधी देण्याची मागणी केली आहे. 'स्टार स्पोर्ट्स' नं त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून त्याच्यावरील प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अँकरनं टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना आमिरला आयपीएलमध्ये संधी मिळेल का? हा प्रश्न विचारला. त्यावर शास्त्री यांनी 'तो नेटमध्ये चांगला दिसतो. त्याला फुटवर्क चांगलं करण्यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. पण, त्याला कोणत्याही टीममध्ये संधी मिळेल,' असं उत्तर दिलं. आमिर खान निराश रवी शास्त्री यांच्या उत्तरानं आमिर खान निराश झाला आहे. त्यानं एक खास व्हिडीओ तयार करत शास्त्रींना उत्तर दिलं आहे. 'रवी मी थोडा निराश झालोय कारण तुला माझं फुटवर्क आवडलं नाही. मला वाटतंय की तू 'लगान' पाहिलेला नाही. आता पुन्हा एकदा पाहा. मी ज्या टीममध्ये असेल ती टीम लकी ठरेल. माझी योग्य पद्धतीनं शिफारस कर' आमिर खानचा 'लाल सिंग चड्डा' हा सिनेमा आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. अद्वैत चंदन या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. अद्वैतनं यापूर्वी 'सिक्रेट सुपरस्टार' हा आमिरचा सिनेमा दिग्दर्शित केला होता. 2009 साली प्रदर्शित झालेला सुपरहिट सिनेमा 'थ्री इडियट्स' नंतर पुन्हा एकदा आमिर खान, करिना कपूर आणि मोना सिंह हे कलाकार 'लाल सिंग चड्डा' मध्ये एकत्र येणार आहेत. IPL 2022 : मुंबईच्या शेवटच्या मॅचमध्ये तरी अर्जुनला संधी मिळणार का? रोहितच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक असलेले रवी शास्त्री सध्या 'स्टार स्पोर्ट्स' वर आयपीएल स्पर्धेचे समालोचन करत आहेत. त्याचबरोबर ते गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर चांगलेच सक्रीय झाले आहेत. शास्त्री यांचे फोटो आणि त्याचे कॅप्शन पाहून त्यांना नेमकं काय झालंय? असा प्रश्न फॅन्स विचारत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aamir khan, Ipl 2022, Ravi shastri

    पुढील बातम्या