जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL चॅम्पियन क्रिकेटपटूचा भारतीय क्रिकेटला अलविदा, आता अमेरिकेत खेळणार

IPL चॅम्पियन क्रिकेटपटूचा भारतीय क्रिकेटला अलविदा, आता अमेरिकेत खेळणार

IPL चॅम्पियन क्रिकेटपटूचा भारतीय क्रिकेटला अलविदा, आता अमेरिकेत खेळणार

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटपटू अमेरिकेत शिफ्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा कॅप्टन उन्मुक्त चंद (Unmukt Chand) काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत शिफ्ट झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 डिसेंबर : भारताचा फर्स्ट क्लास क्रिकेटपटू बिपूल शर्मानं (Bipul Sharma) देशांतर्गत क्रिकेट सोडण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये जन्मलेल्या बिपूलला टीम इंडियाकडून खेळण्याची कधीही संधी मिळाली नाही. त्याने पंजाबकडून 2005 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. बिपूलच्या नावावर 59 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 8 शतक आणि 17 अर्धशतकांसह 3012 रन आहेत. त्याचबरोबर त्याने 126 विकेट्स देखील घेतल्या आहेत. बिपूल आता अमेरिकेत जाणार असून तिथं क्रिकेट खेळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटपटू अमेरिकेत शिफ्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा कॅप्टन उन्मुक्त चंद (Unmukt Chand) काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत शिफ्ट झाला आहे. बिपूलने यावेळी सांगितले की, ‘मी 25 वर्षांपासून क्रिकेट खेळतोय यावर विश्वास बसत नाही. अखेर या खेळाला अलविदा करण्याची वेळ आली आहे. माझ्यावर नेहमी प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार. माझे कुटुंब, आई, काका, पत्नी यांनी मला नेहमी पाठिंबा दिला. विराट कोहलीला कॅप्टनपदावरून हटवल्याचा टीम इंडियाला फायदा! रवी शास्त्रींचा मोठा दावा IPL चॅम्पियन टीमचा सदस्य पंजाब किंग्जनं (Punjab Kings) 2010 साली बिपूलला करारबद्ध रकेले होते. तो पंजाबच्या टीममध्ये 4 वर्ष होता. पण, या कालावधीमध्ये त्याला फक्त 15 मॅच खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनं (SRH) बिपूलला करारबद्ध केले. आयपीएल 2016 सिझनचं विजेतेपद मिळवणाऱ्या टीमचा तो सदस्य होता. बिपूल हैदराबादकडून ‘प्ले ऑफ’ च्या तीन्ही मॅच खेळला. आयपीएल फायनलमध्ये त्याने एबी डिव्हिलियर्सची महत्त्वाची विकेट घेतली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात