जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कोरोनामुळे बदललं 'फॅमिली मॅन'चं आयुष्य, जबरदस्त कमबॅकनंतर बायकोची प्रतिक्रिया Viral

कोरोनामुळे बदललं 'फॅमिली मॅन'चं आयुष्य, जबरदस्त कमबॅकनंतर बायकोची प्रतिक्रिया Viral

कोरोनामुळे बदललं 'फॅमिली मॅन'चं आयुष्य, जबरदस्त कमबॅकनंतर बायकोची प्रतिक्रिया Viral

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील ‘फॅमिली मॅन’साठी ही आपत्ती एक संधी ठरली. सिडनी टेस्टमध्ये त्यानं या संधीचे सोने केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

सिडनी, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) चौथी टेस्ट सिडनीमध्ये सुरू आहे. सिडनी टेस्टच्या चौथ्या ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजानं (Usman Khawaja) शतक झळकावलं. ख्वाजनं यापूर्वी पहिल्या इनिंगमध्येही शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने दुसऱ्या इनिंगमध्येही शंभरी पार करण्याचा विक्रम केला आहे. अ‍ॅशेस सीरिजमधील दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावणारा ख्वाजा हा सहावा ऑस्ट्रेलियन आहे. त्याच्या शतकामुळे सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीमध्ये आहे. ख्वाजाने 131 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने शतक झळकावले. पहिल्या इनिंगमध्ये 137 रन काढणाऱ्या ख्वाजाने दुसऱ्या इनिंगमध्येही आत्मविश्वासानं बॅटींग करत इंग्लंडच्या बॉलर्सचा समाचार घेतला. त्याने कॅमेरून ग्रीन सोबत पाचव्या विकेटसाठी 179 रनची भागिदारी केली. कोरोनामुळे बदलले आयुष्य उस्मान ख्वाजानं यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये शेवटची टेस्ट खेळली होती. त्यानंतर जवळपास अडीच वर्षे तो टीमच्या बाहेर होता. या सीरिजसाठी देखील ख्वाजा ऑस्ट्रेलियन टीमची पहिली चॉईस नव्हता. तिसऱ्या टेस्टनंतर ट्रेव्हिस हेडला (Travis Head) कोरोना झाल्याने ख्वाजाची टीममध्ये निवड करण्यात आली. ख्वाजाने या संधीचा संपूर्ण फायदा घेत दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावले.

जाहिरात

ऑस्ट्रेलियाचा फॅमिली मॅन अडीच वर्षानंतर टीममध्ये परतातच दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावलेला ख्वाजा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये ‘फॅमिली मॅन’ म्हणून देखील ओळखला जातो. ख्वाजाने सिडनी टेस्टमधील दुसऱ्या दिवशी शतक झळकावले होते तेव्हा त्याची पत्नी रचेल स्टेडियममध्ये उपस्थित होती. रचेलनं मुलीसह या शतकाचे सेलिब्रेशन केले. ख्वाजाची पत्नी आणि मुलीचे हे सेलिब्रेशन देखील चांगलेच व्हायरल झाले आहे.

ख्वाजनं झळकावलेल्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने सिडनी टेस्ट जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर 388 रनचे टार्गेट ठेवले आहे. या सीरिजमधील पहिल्या तीन टेस्ट इंग्लडने यापूर्वीच गमावल्या आहेत. राहुलच्या कॅप्टनसीवर पंजाबचा कोच नाराज, टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर घेतला आक्षेप

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात