सुरेश जाधव, 11 सप्टेंबर : बनावट स्वाक्षरी केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने भाजपच्या आमदार आणि त्यांच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडालीय. बीड जिल्ह्यातील केज मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार संगीता ठोंबरे यानी केज पासून जवळच स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी उभारली या सूतगिरणीमधे गणाजी सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्यांना संचालक पदावर नियुक्त केलं होतं. या विरोधात केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे फिर्यादींनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ. विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर फौजदारी संहिता कलम 153(3)अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतं ‘वंचित’ला मिळालीच नाहीत - प्रकाश आंबेडकर आ.संगीता ठोंबरे या भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापणार आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे सूतगिरणी केज’च्या संचालकपदी बोगस स्वाक्षरी करून निवडले असल्याचा आरोप करत तक्रारदार गणपती सोनप्पा कांबळे यांनी याआधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कांबळे यांच्या याचिकेवर केज दिवानी न्यायालयाने आज निकाल दिला. न्यायालयाने सूतगिरणीचे अध्यक्ष डॉक्टर विजयप्रकाश ठोंबरे व भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अजित पवारांचा पलटवार, किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला शब्द पाळतो! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ.संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल होत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार ठोंबरे यांनी दोन वर्षांपूर्वी केज येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने नवीन सूतगिरणी उभारली होती. न्यायालयाने या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केज येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद केला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







