चेन्नई,6 नोव्हेंबर: सेल्फी काढण्याच्या नादात चेन्नईतील पट्टबिरम भागातील शेतातील विहिरीत बुडून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरुण अत्यावस्ठ असून त्याच्यावर सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच या तरुण-तरुणीचा साखरपुडा झाला होता तर लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले होते. परंतु एका सेल्फीने घात केला आणि लग्नगाठ बांधण्याअगोदरच या जोडप्याची साथ सुटली, असेच म्हणावे लागेल. मिळालेली माहिती अशी की, टी मर्सी स्टेफी (वय-24) असे मृत तरुणीचे नाव आहे. डी अप्पू याच्यासोबत तिचे लग्न ठरले होते. टी मर्सी स्टेफी आणि डी अप्पू हे दोघे कांदिगाई गावातील शेतात फिरायला गेले होते. शेतातील विहिरीच्या पायऱ्यांवर बसून दोघे फोटो एकमेकांचे फोटो घेत होते. यावेळी सेल्फी घेण्याचा मोह टी मर्सी स्टेफी हिला आवरता आला नाही. विहिरीच्या कठड्यावर बसून स्टेफी ही सेल्फी घेत असताना तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली. तिला वाचवण्याच्या नादात अप्पूचाही विहिरीत तोल गेला. दोघांचा आरडाओरडा ऐकून शेतकरी विहिरीत उतरला. त्याने अप्पूला वेळीच बाहेर काढले, पण स्टेफीचा शोध लागेपर्यंत उशीर झाला. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी विहिरीतून स्टेफीचा मृतदेह बाहेर काढला. अप्पूवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तरुणाई सेल्फीच्या आहारी.. आजच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या अत्याधुनिक युगात तरुणाई सेल्फीच्या आहारी गेली आहे. सेल्फीच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चेन्नईतील पट्टबिरम भागात सेल्फीमुळे शेतातल्या विहिरीत पडून तरुणीला प्राण गमवावा लागला आहे. VIDEO : ‘त्या’ बैठकीबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.