कोरोनापासून वाचण्यासाठी Work From Home करताय? मग लक्षात ठेवा या गोष्टी

कोरोनापासून वाचण्यासाठी Work From Home करताय? मग लक्षात ठेवा या गोष्टी

कोरोनामुळे आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी भारतासह जगभरातील अनेक कंपन्यांनी घरून काम करण्याची सुविधा दिली आहे.

  • Share this:

कोरोनाचा दहशत साऱ्या जगात पसरली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारतासह जगभरातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे तर, काही ठिकाणी घरून काम करण्याची (Work From Home) सुविधाही दिली आहे. याचे कारण कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये आणि सुरक्षित राहून ते काम करू शकतात.

घरून काम करणे सोयीचे असले तरी, इतर कर्मचाऱ्यांशी समन्वय साधताना आणि टीम वर्क योग्य प्रकारे करण्यास बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी खालील गोष्टी लगेच करा.

सिस्टम डेवलप करा

घरातून काम करत असतानाही इतरांशी संवाद साधणे महत्त्वाचे असते. यासाठी सिस्टम अपडेट असणे जास्त गरजेचे आहे. याकरिता ईमेल सूची तयार करा किंवा सोशल मीडियावर एक ग्रुप तयार करा ज्यामध्ये आपल्या सर्व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. त्यामुळे कामाचे सर्व तपशील आणि तपशील चॅटवर अपलोड करता येईल.

शेअर ड्राईव्हचा जास्तीत जास्त वापर करा

जी सूटच्या मते, घरातून काम करण्यासाठी वेबडेटा सारख्या शेअर ड्राईव्हचा वापर करा. ज्यामुळे आवश्यक माहिती ठेवता येईल. म्हणजे इतर कर्मचारीसुद्धा आवश्यकतेनुसार ते डेटा वापरू शकतात.

व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर करा

घरातून काम करताना काही महत्त्वाची माहिती किंवा मिटींग असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर करू शकता. यामुळे तुमचे कामही सोपे होईल आणि तुम्हाला काही त्रुटी किंवा शंका असल्यास त्यातुम्ही निसंकोचपणे विचारू शकता.

घरातून करा कोरोनाचा सामना

घरातून काम करत असाल तर, नियमितपणे हात धुणे विसरू नका. त्याचबरोबर घरी काम करताना मास्कचा वापर करा. तुम्ही काम करत असलेली जागा रोज साफ करा, ज्यामुळे विषाणूचा संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर लॅपटॉप, कम्पूटर यांचा साफ करूनच वापर करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2020 09:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading