नवी दिल्ली, 18 मार्च : देशात हळूहळू उकाडा वाढतो आहे, त्यात अनेक जण कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) घरातून काम करत आहेत. जरा गरम झालं की आपण घरातील एसी (AC) चालू करतो. थंडावा मिळाल्यानंतर थोडा आराम वाटतो. मात्र आता ठंडा ठंडा कूल कूल होताना थोडा विचार करा. कारण एसीमुळेही कोरोनाव्हायरसचा धोका आहे, त्यामुळे सावध राहा.
तज्ज्ञांच्या मते, कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या थेट संपर्कात येण्याव्यतिरिक्त एसीमुळेही कोरोनाव्हायरसचा धोका वाढतो. एसीमुळे कोरोनाव्हायरस वाढण्याचा आणि पसरण्याचा धोका अधिक आहे.
हे वाचा - अरे देवा! ‘कोरोना’सह आता राज्यात माकड'ताप', दोघांचा मृत्यू
ऑल इंडिया इन्स्टिट्टुयट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्यानुसार, 'गरमीमुळे कोरोनाव्हायरस निष्क्रिय होईल, याचे काही पुरावे नाहीत. मात्र गरमी वाढते, तशी लोकं एसीचा वापर जास्त करतात. यामुळे घरातील तापमान कमी होतं आणि घरात आधीपासूनच असलेला व्हायरस पुन्हा सक्रिय होतो. असं वातावरण व्हायरससाठी अनुकूल होतं कारण एसी सुरू असल्यावर आपण घरातील वेंटिलेशनचे सर्व मार्ग बंद करतो, ज्यामुळे हवा खेळती राहत नाही. घरात दमटपणा वाढतो'
हे वाचा - 'या' Blood group च्या व्यक्ती 'कोरोना'च्या सर्वाधिक शिकार, धक्कादायक संशोधन
तज्ज्ञांच्या मते, थंड ठिकाणी व्हायरस तग धरू कतो. यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झपाट्याने परू शकतो. ज्या घरात वेंटिलेशनची व्यवस्था चांगली नाही, ती जागा व्हायरससाठी सर्वात चांगली ठरते.
त्यामुळे सिंगापूर सरकारनेही लोकांना एसी बंद करून पंख्याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय भारतीय रेल्वेने एसी लोकलमध्ये काही मानकं ठरवलीत.
जगभरात कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) 1.83 लाखांपेक्षा जास्त लोकांना आपल्या विळख्यात घेतलं आहे, तर 7,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. 80 हजार लोकं बरी झालीत, त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र तरीही या व्हायरसचा धोका अधिक वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
हे वाचा - महाराष्ट्राशेजारील राज्यात 'कोरोना'सह बर्ड फ्लूचं संकट; चिकन, अंडी विक्रीवर बंदी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.