नवी दिल्ली, 04 मे : कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही श्वसन समस्या नाही. हे रुग्ण हसत आहेत, बोलत आहेत. मात्र कोणतीही गंभीर लक्षणं नसताना अशा रुग्णांचा मृत्यू होतो आहे. कोरोनाव्हायरसच्या याच नव्या लक्षणामुळे आता डॉक्टरांची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांचा अशाप्रकारे अचानकपणे होणाऱ्या मृत्यूला हॅपी हायपोक्सिया (Happy hypoxia) ला कारणीभूत मानलं जातं आहे. शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी (low oxygen level) झाल्यास सामान्यपणे श्वसनसंबंधी समस्या जाणवते. ज्याला हायपोक्झिया (hypoxia) म्हणतात. त्यावेळी रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो, घाम येतो, नीट बोलता येत नाही आणि रुग्ण बेशुद्धही होऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तात्काळ उपचार मिळाले नाहीत तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. मात्र कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याची अशी कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. रुग्णालाही याबाबत माहिती नसते आणि डॉक्टरांनाही खोलवर तपासणी केल्याशिवाय समजत नाही. ज्याला हॅपी हायपोक्सिया (Happy hypoxia) किंवा सायलेंट हायपोक्सिया (silent hypoxia) म्हटलं आहे.आणि यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होतो आहे. हे वाचा - Coronavirus चा धोका : तुमच्या त्वचेवर तर अशी लक्षणं नाहीत ना? दुर्लक्ष करू नका मॅन्चेस्टर रॉयल इन्फर्मरीच्या (Manchester Royal Infirmary) क्रिटिकल केअर आणि अॅनेस्थेशियाचे डॉक्टर जॉन्थन बॅनर्ड-स्मिथ यांच्या मते, कोरोनाची अशी प्रकरणं खूप गुंतागुंतीची आहेत. या रुग्णामध्ये ऑक्सिजनची पातळी खूपच कमी आहे आणि त्याची लक्षणं दिसत नाहीत. सामान्यपणे शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण 95 ते 98% असतं. यापेक्षा कमी किंवा जास्त ऑक्सिजन धोकादायक असतं. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी 70% तर काही रुग्णांमध्ये 50% ही दिसून आली आहे. आतापर्यंत न्युमोनिया किंवा श्वसनसंबंधी कोणत्याही आजारात असं दिसून आलं नाही, असं डॉ. जॉन्थन म्हणाले. हे वाचा - लॉकडाऊनमुळे ‘कभी खुशी कभी गम’, मूड स्विंग असा करा दूर कोरोनाव्हायरस शरीरावर अशाप्रकारे हल्ला करत असेल ज्यामुळे अवयवाला हानी पोहोचते मात्र त्याची लक्षणं दिसत नाहीत आणि रुग्णाचा मृत्यू होतो. महाराष्ट्रातही हॅपी हायपॉक्झियाचे रुग्ण देशभरात आतापर्यंत 42 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात हा आकडा 13 हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मृत्यूदरही जास्त आहे आणि याला कारण हॅपी हायपोक्झिया मानलं जातं आहे. टाइम्स ऑफ इंडिया च्या एका रिपोर्टनुसार स्टेट चीफ सेक्रेटरीचे टेक्निकल अॅडव्हायझर डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितलं की, पुण्यात असे कित्येक प्रकरणं समोर आलीत ज्यामध्ये रुग्ण हसत, बोलत होते मात्र काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता रुग्णांच्या लक्षणांची यादी तयार केली जाते आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.