मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंची जनतेला कळकळीचीं विनंती, काय म्हणाले मनसे प्रमुख?

मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंची जनतेला कळकळीचीं विनंती, काय म्हणाले मनसे प्रमुख?

राज ठाकरे यांनी फेसबूकवर यांसंबंधी एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज यांनी जनतेसाठी झटणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले असून काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी फेसबूकवर यांसंबंधी एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज यांनी जनतेसाठी झटणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले असून काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी फेसबूकवर यांसंबंधी एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज यांनी जनतेसाठी झटणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले असून काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 14 एप्रिल : देशात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पुढचे काही दिवस आता राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. मोदींनी जनतेला आवाहन केल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील जनतेला सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी फेसबूकवर यांसंबंधी एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज यांनी जनतेसाठी झटणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले असून काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत. तर नागरिकांना राज ठाकरे यांनी या मेसेजमधून कळकळीची विनंतीदेखील केली आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 'कोरोनाच्या या महासंकटाच्या परिस्थितीशी संपूर्ण महाराष्ट्र एकत्रितपणे झुंजत आहे आणि त्यात महाराष्ट्र सैनिक देखील जमेल त्या पद्धतीने कार्यरत आहेत, लोकांच्या मदतीला धावून जात आहेत, त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत आहेत. अर्थात राज्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटात महाराष्ट्र सैनिक धावून जातोच आणि तो आत्ताही जात आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कोरोनामुळे इतर रूग्णांवर उपचार नाकारले, रुग्णालयाबाहेरच महिलेचा मृत्यू ह्या मदतकार्याची छायाचित्रं connectrajthackeray@gmail.com वर येत आहेत जे मी व्यक्तिशः पाहत आहे आणि त्यातील जास्तीत जास्त कामांना एमएनएस अधिकृतवर प्रसारीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, ज्याचा उद्देश इतकाच की त्या त्या भागातील लोकांना काही गरज असल्यास कोणाशी संपर्क साधावा हे कळावं. पण या सगळ्यात एक बाब जाणवली ती म्हणजे त्यातले काही मोजके जणं कॅमेऱ्याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणे, ज्याला मदत दिली जात आहे त्याला कॅमेऱ्यात बघण्यास सांगणे किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढणे या चुकीच्या गोष्टी करत आहेत. आपण ज्याला मदत करतो आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला अधिक लाजवत नाही आहोत का? मुळात प्रत्येक माणूस स्वाभिमानी असतो आणि शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं पण आज प्रसंग बाका आहे त्यामुळे तो नाईलाजाने मदत स्वीकारत आहे, अशा वेळेस त्याची छायाचित्रं काढून त्याची मान शरमेने खाली घालणं कितपत योग्य आहे? तसंच मदतकर्त्याने देखील कॅमेऱ्यात बघत फोटो काढणं हे देखील सुद्धा योग्य आहे का? आता हे अँटी-व्हायरल औषध कोरोनाला हरवणार, ICMRने दिली महत्त्वाची माहिती या कठीण प्रसंगात फक्त महाराष्ट्र सैनिकच नाहीत तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील मनापासून मेहनत घेत आहेत, मदतीला धावून जात आहेत. त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. माझं त्यांना पण आवाहन आहे की तुम्ही देखील ह्याचा विचार करावा. महाराष्ट्राची निरपेक्ष सेवेची परंपरा मोठी आहे, त्या परंपरेचं पुन्हा एकदा दर्शन आपण सगळ्यांनी जगाला दाखवूया. तसंच महाराष्ट्र सैनिकांनो, जर या पुढे कोणत्याही मदतकार्याची छायाचित्रं ई-मेलवर पाठवली जाणार असतील त्या मदतीच्या प्रमाणाचे, साहित्याचे, संपर्कस्थळाचे इत्यादी पुरती छायाचित्रं मर्यादित असतील हे बघावं. तसंच ह्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक दररोज काही ना काही मदत करत आहेत पण रोज त्या मदतीला अधिकृतवर प्रसारित करणं शक्य पण नाही आणि ते यथोचित होणार नाही. बाकी तुम्ही करत असलेलं काम उत्तम आहे ते सुरु ठेवावं, तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत काम करत आहात त्याचा मला अभिमान आहे. सगळ्यात महत्वाचं, सर्व राजकीय कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना माझी कळकळीची विनंती आहे की हे मदतकार्य करत असताना तुम्ही स्वतःची, तुमच्या कुटुंबाची पण नीट काळजी घ्या. बाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि प्रशासनाला जास्तीत जास्त विश्वासात घेऊन काम करा.' संपूर्ण देश 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या