मराठी बातम्या /बातम्या /देश /

संपूर्ण देश 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

संपूर्ण देश 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

'आर्थिकदृष्ट्या पाहता हे खूप महाग आहे. याची मोठी किंमत मोजावी लागली. पण देशातील लोकांच्या जीवापुढे याची काही किंमत नाही.'

'आर्थिकदृष्ट्या पाहता हे खूप महाग आहे. याची मोठी किंमत मोजावी लागली. पण देशातील लोकांच्या जीवापुढे याची काही किंमत नाही.'

'आर्थिकदृष्ट्या पाहता हे खूप महाग आहे. याची मोठी किंमत मोजावी लागली. पण देशातील लोकांच्या जीवापुढे याची काही किंमत नाही.'

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली, 14 एप्रिल : संपूर्ण देश 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातील सर्व नागरिकांना 3 मेपर्यंत नियमांचं पालन करावं लागणार आहे. या दिवसांमध्ये सगळ्यांना खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचंही मोदी म्हणाले. दरम्यान, काही राज्यांनी आधीच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. पण आता मोदींनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची मोठी घोषणा केली आहे. मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे - भारताची लढाई मोठ्या हिम्मतीने सुरू आहे. नागरिकांच्या त्यागामुळे कोरोनामुळो होणाऱ्या नुकसानीला बऱ्यापैकी आवरण्यात यशस्वी झालो आहोत. - तुम्हाला होणाऱ्या त्रासाची मला कल्पना आहे. कोणाला अन्न नाही, प्रवासी अडकले, पण तरी तुम्ही आपले कर्तव्य सोडले नाही. - प्रत्येकजण सैनिकाप्रमाणे कर्तव्य बजावत आहात. मी तुम्हाला आदरपूर्वक सलाम करतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो - आंबेडकरांना देशाने संयमाद्वारे श्रद्धांजली वाहिली - लोकांचा हाच संयम प्रेरणादायी आहे - आपल्या देशात कोरोना येण्याआधीच एअरपोर्टवर लोकांची स्क्रिनिंग सुरू करण्यात आली - आपल्या देशात 550 रुग्ण होते तेव्हा भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला - समस्या दिसली तेव्हाच आपण उपाययोजना केल्या - अनेक सार्वजनिक स्थळं तातडीने बंद केली - देशात येणाऱ्या प्रत्येकाला 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यावर निर्बंध घातले - वेळीच हे सगळे निर्णय घेतले नसते तर आता भारतीची स्थिती काय असती याचा विचार करणंही अंगावर काटा आणतात - सोशल डिस्टिंसिंग आणि लॉकडाऊनमुळे मोठा फायदा देशाला झाला आहे - आर्थिकदृष्ट्या पाहता हे खूप महाग आहे. याची मोठी किंमत मोजावी लागली. पण देशातील लोकांच्या जीवापुढे याची काही किंमत नाही - इतर देशांपेक्षा भारतात स्थिती आटोक्यात आहे - भारतातही कोरोनाच्या विरोधात लढाई जिंकण्यासाठी सगळ्यांकडून सांगण्यात आलं की लॉकडाऊन वाढवण्यात यावं - काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्यातही आलं - भारतामध्ये 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. PM मोदींआधीच 'या' राज्यांनी वाढवला होता लॉकडाऊन काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सुमारे 10 मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. इतकेच नव्हे तर अशी अनेक राज्ये आहेत ज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. देशात सर्वप्रथम ओडिशाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला. त्यानंतर पंजाबने 1 मेपर्यंत तर, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, पश्चिम बंगाल यांनी 30 एप्रिलपर्यंच लॉकडाऊन वाढवला आहे. कर्नाटक सरकारने दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. याशिवाय ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि मेघालय यांनीही लॉकडाऊन कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविला आहे. भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 10 हजारावर रताने दहा हजारांचा टप्पा पार केला. देशात आतापर्यंत 10,363 कोरोना व्हायरस रुग्ण आढळले आहेत. तर जवळपास 1 हजार 36 रुग्ण बरे झाले. यामध्ये 399 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मंगळवारी सकाळी एकूण मृतांचा आकडा 339 वर पोहोचला. संसर्ग झालेल्यांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1211 नवीन कोरोना ग्रस्त तर जवळपास 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 10363 प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याच वेळी, सोमवारी दिल्लीत, कोरोना विषाणूचे सर्वाधिक 356 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रूग्णांपैकी 325 जण जमातशी संबंधित असून आतापर्यंत मरकज संबंधित एकूण 1071 लोक सकारात्मक आढळले आहेत. या 356 नव्या घटनांसह दिल्लीतील रूग्णांची एकूण संख्या 1510 पर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर दिल्लीतील चार लोकांच्या मृत्यूसह मृतांचा आकडा 28 वर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी नोंदवलेल्या 356 नवीन प्रकरणांपैकी 325 प्रकरणे एकाच साखळीतून समोर आली आहेत. संपादन - रेणुका धायबर
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या