नवी दिल्ली, 14 एप्रिल : कोरोनामुळे भारतात दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. याचे कारण म्हणजे, वाढती कोरोनाबाधितांची संख्या. भारतात कोरोनाचा आकडा हा 10 हजारहून अधिक झाला आहे. त्यामुळे सध्या देशभरातील सर्व रुग्णालये ही कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे हाल होत आहेत ते इतर रुग्णांचे. काही रुग्ण रुग्णालयाबाहेर आहेत, तर अनेकांचा उपचाराविना मृत्यू होत आहे. असाच प्रकार नवी दिल्लीत घडला. शाहजहां यांची आई गेल्या दोन आठवड्यांपासून व्हेंटिलेटरवर होती, मात्र कोरोनामुळे त्यांना अचानक बाहेर जाण्यास सांगितले. शाहजहां यांच्या आईला दिल्लीतील दिल्लीतील लोकनायक रुग्णालयातून अचानक डिस्चार्ज देण्यात आला. यकृताच्या आजारामुळे गंभीर प्रकृती असलेल्या या महिलेला रुग्णायल कोरोनाग्रस्तांसाठी राखीव केल्यानंतर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दुसर्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे एक नातेवाईक मोहम्मद खालिद यांनी सांगितले की, रुग्णालय प्रशासनाने त्यांना मरण्यासाठी सोडून दिले. वाचा- साईभूमी शिर्डी हादरली, कोरोनाशी महिलेची झुंज अपयशी इतर रुग्णांचे होत आहेत हाल कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. भारतातही अशीच परिस्थिती आहे. कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु इतर आजारांनी ग्रस्त असलेला रुग्ण कुणालाच दिसत नाही. असे डझनभर रुग्ण दिल्लीच्या एएमएमच्या बाहेर दिसतील. बरेच लोक जवळच्या सबवे येथे राहत आहेत तर अनेकांना तंबूत राहायला भाग पाडले जात आहे. वाचा- सोन्याचे दर गाठणार उच्चांक! वर्षाअखेरीस 55 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता लॉकडाऊनमध्ये अडकले लोक देशातील विविध शहरांतून लोक दिल्ली येथे उपचार घेण्यासाठी दाखल होतात. कोरोना विषाणूमुळे रुग्णालयात रूग्णांच्या नेमणुका रद्द करण्यात आल्या आणि त्यानंतर अचानक 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.अशा परिस्थितीत बाहेरून आलेले लोक दिल्लीत अडकले आहेत. आता त्यांना उपचार सोडा एकवेळचं अन्नही मिळत नाही आहे. वाचा- आता हे अँटी-व्हायरल औषध कोरोनाला हरवणार, ICMRने दिली महत्त्वाची माहिती 3 मेपर्यंत वाढवला लॉकडाऊनचा कालावधी कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवला आहे. आज देशाच्या जनतेशी संबोधताना मोदींनी ही घोषणा केली. देशातील सर्व नागरिकांना 3 मेपर्यंत नियमांचं पालन करावं लागणार आहे. तसेच, येत्या 8 दिवसांच निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत. याआधी काही राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.