धक्कादायक! कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

कोरोनाची तपास करण्याच्या बहाण्याने 36 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

चुरू (राजस्थान), 23 मे : देशात कोरोनाचा कहर सुरू असताना महिला अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाची चाचणी करण्याच्या बहाण्याने 36 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पीडीतेला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या बातमीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात पीडित महिलेने गुरुवारी पोलीस ठाण्यात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजस्थानमध्ये हावडा इथे रहिवासी असलेली महिला आपल्या सासरी डीडवानाहून घरी येण्यासाठी पायी निघाली. वाटेत तिला एका ट्रॅक्टरने रतनगडला पोहोचवलं. पण तिथून पुढे हावडा इथे जाण्यासाठी तिला कोणतंही साधन मिळालं नाही. म्हणून ती स्टेशन रोडवर बसली, तेथे काही साधूंनी तिला जेवणही दिलं.

कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली सामूहिक बलात्कार

यादरम्यान, आरोपी मुस्तक आणि त्रिलोक महिलेकडे गेले आणि रुग्णालयाच्या आवारात असलेल्या दुधाच्या डेअरीमागे तिला झोपवलं. 20 मे च्या दिवशी सकाळी ते दोघे पुन्हा तिथे आले आणि म्हणाले की, कोरोनाची चाचणी करावी लागेल. या बहाण्याने त्यांनी तिला रुग्णालयाच्या शौचालयामागे नेलं. जिथे दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये बांधलेल्या सुलभ कॉम्प्लेक्समध्ये महिलेला स्नान करण्यास नेलं तिथेदेखील संकुलात काम करणाऱ्या कर्मचार्‍याने तिच्याशी अश्लील कृत्य केलं.

पती-पत्नीला कोरोनामुक्त घोषित करुन फुलांची उधळण, नंतर समोर आली धक्कादायक बाब

या घटनेनंतर रतनगड इथल्या विजय नायक नावाचा युवकाला पीडितेला भेटला आणि त्याने तिला पोलीस ठाण्यात नेलं. तिथे पीडितेने तिघांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. डीएसपी प्यारेलाल मीणा यांनी सांगितलं की, तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत

डीएसपी प्यारेलाल मीणा यांनी सांगितलं की, ही महिला पश्चिम बंगालची आहे. ती तिच्या सासरी डीडवानामध्ये होती. ती पश्चिम बंगालला तिच्या घरी जाण्यासाठी पायी निघाली होती. रेल्वे स्टेशनवर, तिला 2-3 मुलं भेटली ज्यांनी त्याला कोरोना स्क्रिनिंग करण्यास सांगितलं. ते तिला तपासणीच्या बहाण्याने शौचालयाजवळील झुडुपाजवळ घेऊन गेले. दोन्ही मुलांनी तिच्यावर बलात्कार केला आणि एकाने विनयभंग केल्याचे या महिलेनं सांगितल आहे. यामुळे तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

राज्यपाल Vs ठाकरे सरकार, 'या' मुद्द्यावरून पुन्हा उडाला खटका

संपादन - रेणुका धायबर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2020 08:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading