Home /News /news /

तुमचा बरा रुग्ण, पुणेकर दाम्पत्याने कोरोनाला हरवून डॉक्टरांना लिहिलं भावूक पत्र

तुमचा बरा रुग्ण, पुणेकर दाम्पत्याने कोरोनाला हरवून डॉक्टरांना लिहिलं भावूक पत्र

दुबईतून आलेले हे दाम्पत्य 9 मार्च रोजी कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं. या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती.

    पुणे, 25 मार्च : महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा विळखा पडला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे तर आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आज पुण्यात आढळलेले कोरोनाबाधित दाम्पत्य पूर्ण उपचार घेऊन घरी परतले आहे. या दाम्पत्याने नायडू हॉस्पिटल आणि डॉक्टराने आभार मानले आहे. दुबईतून आलेले हे दाम्पत्य 9 मार्च रोजी कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं. या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. गेल्या 14 दिवसांपासून या दाम्पत्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत हे दाम्पत्य निगेटिव्ह आढळले. आज या कुटुंबाला घरी सोडण्यात आलं आहे. हेही वाचा - 'मी घरी बसून मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका' या दाम्पत्याने हॉस्पिटलमधून जाताना आपला अभिप्राय हॉस्पिटलच्या डायरीत व्यक्त केला आहे. या पत्रातून त्यांनी कोरोनाबद्दल संपूर्ण जनतेला आवाहन केलं आहे. 'आम्ही 9 मार्चपासून नायडू हॉस्पिटलमध्ये भरती झालो होतो. हॉस्पिटल आणि डॉक्टरांनी ज्या सुचना केल्या होत्या. त्याचं तंतोतत पालन केलं. त्यानंतर माझ्यावर 14 व्या दिवशी तर पत्नीवर 15 व्या दिवशी चाचणी करण्यात करण्यात आली. या चाचणी आम्ही दोघेही आता निगेटिव्ह निघालो. त्यामुळे आम्हा दोघांनाही आता घरी सोडत आहेत.  आम्ही कोरोनापासून मुक्त आणि निरोगी झालो असून इतरही रूग्ण बरे होतील याची खात्री आहे. पण, सर्वांनी नियमांचे पालन जसे पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि इतर वैद्यकीय, सरकारी अधिकारी ज्या सुचना करत आहे. त्यांचं पालन केलं तर या रोगाला आपण हरवू शकतो. आम्ही पुन्हा एकदा नायडू हॉस्पिटल, सर्व डॉक्टर, नर्स स्टाफ, ससून रुग्णालयाचे डीन आणि डॉक्टर यांचे आणि पुणे महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे मनपूर्वक आभार मानतो व अशीच सेवा सर्वांना मिळेल ही अपेक्षा करतो. हेही वाचा -ऐकत नाहीत म्हणून दुकानदारांनीच वापरली शक्कल, पुणे-दिल्ली सामान खरेदीचा नवा फंडा दरम्यान, पुणे   माहिती  विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्हणाले की,  आरोग्‍य यंत्रणेनं पहिले दोन पेशंट बरे व्‍हावे, यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्‍न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसंच  विभागाच्‍या  इतर जिल्‍ह्यातील अधिकारी  हे कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी काम करीत आहे, असं म्हणत त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. तसंच, काही कर्मचारी आदेशाचे उल्‍लंघन करुन निघून जात असतील तर त्‍यांच्‍यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही म्‍हैसेकर यांनी दिला. 'जवळ-जवळ 90 टक्‍के अहवाल निगेटिव्‍ह' पुणे विभागात एकूण  825 नमुने घेतले होते, त्‍यापैकी  737 चे अहवाल प्राप्‍त झाले.  यामध्‍ये 692 अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत तर 37 अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ 90 टक्‍के अहवाल निगेटिव्‍ह आलेत, ही समाधानाची बाब आहे. पंतप्रधान मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. त्‍याचे नागरिकांनी  कुठेही उल्‍लंघन करु नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसंच. 'या 21  दिवसांत आपल्‍या सर्वांची  साथ, सर्वांचे सहकार्य  या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी मदत करू शकते. कोणत्‍याही जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणजे औषधी, भाजीपाला, अन्‍नधान्‍य आपल्‍यापर्यंत पोहोचवण्‍याचा आमचा आटोकाट प्रयत्‍न राहील, प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला  सहकार्य करावं, असं आवाहनही त्‍यांनी केलं.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या