जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मी घरी बसून मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका'

'मी घरी बसून मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका'

'मी घरी बसून मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका'

‘भाजीपाल्याची दुकाने बंद होणार नाहीत. कृपया गर्दी करू नका,’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मार्च : गुढीपाडव्याच्या मुहूर्तवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत सर्वांना या सणाच्या शुभेच्या दिल्या आहेत. तसंच राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. ‘जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडे असतील. कोणत्याही वेळा नसणार आहेत. भाजीपाल्याची दुकाने बंद होणार नाहीत. कृपया गर्दी करू नका,’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही आता तुम्ही सर्व घरी आहात. घरात बसून कुटुंबियांसोबत आनंद घ्या,’ असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच मी घरात बसून काय करतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. अजित पवारांनीही केलं आवाहन राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित ठेवेल, असा विश्वास देतानाच उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना खरेदीसाठी गर्दी करु नये, नागरिकांनी खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी, असं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतीलच, परंतु जीवनावश्यक वस्तंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 5 ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या 112 वर पोहचणं गंभीर आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. अमेरिकेनं ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनं अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडणं टाळावं, असंही अजित पवार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात