नाशिक, 30 मार्च : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आता नाशिकमध्येही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आतापर्यंत परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांनी चाचणी घेण्यात आली होती. परंतु, या चाचणी जवळपास बरेच जण हे निगेटिव्ह आढळले होते. परंतु, यापैकी 9 संशयितांपैकी 8 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले तर एका तरुणाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने कोणताही परदेश दौरा केला नव्हता.
हेही वाचा -लॉकडाऊननंतर कोरोनाचा उद्रेक, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती; सांगितला बचावाचा मार्ग
पॉझिटिव्ह संशयित हा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहे. लासलगावच्या निफाड तालुक्यातील 30 वर्षीय तरुण आहे. या व्यक्तीची कोणताही प्रवास केल्याची माहिती नाही. पहिला रुग्ण आढळल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून या रुग्णावर विशेष कोरोना कक्षात उपचार सुरू आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
या पॉझिटिव्ह रुग्णाच्या 6 कुटुंबीयांना स्क्रिनिंगसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. तसंच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेणं सुरू आहे.
हेही वाचा -भयंकर! इथे लोकं मृतदेहाशेजारीच झोपतात आणि त्यांना जेवायला सुद्धा देतात
पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासकीय आपत्कालीन यंत्रणा गतिमान झाली आहे. तसंच जिल्ह्यात, कलम 144 सक्त अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे.
दरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1024 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत देशभरात 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 8 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे. शनिवारपर्यंत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 155 वर पोहोचली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.