नवी दिल्ली, 21 एप्रिल : देशाच्या विविध भागात कोरोनाची वाढती प्रकरणं आणि राज्य सरकारच्या कामावरून केंद्र सरकार आता अत्यंत सावध झाले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास कडक कारवाई केली जाईल आणि लॉकडाऊन कालावधीही वाढविला जाऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले आहे. देशात कोरोनाचा फौलाव रोखण्यासाठी योग्य अशा उपाययोजना करूनही अशा प्रकारे जर रुग्णांची संख्या वाढत असेल तर ही चिंतेची बाब असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
तसेच, नुकत्याच देण्यात आलेल्या विविध सूटदेखील पुन्हा बंद केल्या जाऊ शकतात. सद्यस्थितीत केंद्राची विशेष पथके काही राज्यांत भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतील. नंतर, लॉकडाऊन वाढवायचा की नाही याचा विचार केला जाऊ शकतो. केंद्राला अशी आशा आहे की, लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात होणार्या संसर्गाचा मोठ्या प्रमाणात अंकुश ठेवता येईल, परंतु काही राज्यांनी ज्या प्रकारे वागणूक दिली आहे आणि सूट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे त्याप्रमाणे परिस्थिती नाजूक आहे.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या हॉटस्पॉट भागातील परिस्थितीही गंभीर आहे, तर पश्चिम बंगालमध्ये धोका वाढला आहे. तेथे फारशी प्रगती दिसून येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जर नियमांचं पालन केलं गेलं नाही आणि रुग्णांच्या संख्येत अशी वाढ होत राहिली, तर केंद्र सरकारला नाईलाजाने लॉकडाऊन वाढवावा लागेल असं सांगण्यात येत आहे.
राज्यात 75 हजार रॅपिड टेस्ट करण्यास अखेर केंद्र सरकारची मान्यता
...तर राज्यात सुरू होऊ शकतात वाईन शॉप
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यपींसाठी एक खूशखबर दिली आहे. ती, म्हणजे राज्यात वाईन शॉप लवकरच सुरु होऊ शकतात, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं योग्य पालन केल्यास वाईन शॉपवर कोणतीही बंदी असणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्ह आणि झूम अॅपच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं होतं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे यांनी राज्यात वाईन शॉप सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत.
Lockdown मध्ये या बॉलिवूड स्टार्सनी आठवले जुने दिवस आणि शेअर केले HOT PHOTOS
दरम्यान, देशासह राज्यात 3 मेपर्यत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. जीवनाश्यक वस्तू वगळता राज्यात सर्व गोष्टींवर निर्बंध घालण्यात आली आहे. त्यात हॉटेल, बियर बार आणि वाईनशॉपचा समावेश आहे. मात्र, 20 एप्रिलनंतर संचारबंदी शिथिल करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. याकाळात अनेक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. त्याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र बंदी असलेल्या यादीत दारुच्या दुकानांचा उल्लेख नाही. तसंच ते कधी सुरु होणार याबाबतही खुलासा करण्यात आलेला नाही. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रश्न करण्यात आला होता.
आम्ही कोरोनाविरुद्ध लढतोय, डॉक्टरांवरचे हल्ले थांबवा; IMAने व्यक्त केला संताप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona