मुंबई 20 एप्रिल: कोरोनाविरुद्धच्या लढाईल सगळ्यात आघाडीवर डॉक्टर्स लढत आहेत. मात्र अनेक शहरांमध्ये थेट डॉक्टरांवरच हल्ल्याच्या घटना घडत आहेत. चेन्नईत तर डॉक्टरच्या पार्थिवाचा अवमान करण्याची सुद्ध घटना घडली होती. तर अनेक ठिकाणी हल्ले झालेत. या सर्व घटनांचा Indian Medical Association (IMA) ने तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यांविरुद्ध 22 एप्रिलला डॉक्टर्स 'white alert' पाळणार असून मेनबत्ती लावून निषेधही करणार आहे. हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश काढावा अशी मागणीही IMAने केली आहे.
राज्यातल्या कोरना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 12 तासांमध्ये आज 466 नवीन रुग्ण सापडले. तर 9 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरनाबाधितांची संख्या 4,666 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 232वर गेला आहे. आज 65 रुग्ण बरे झालेत. तर त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 572 झाली आहे. तर राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या 76 हजार 92 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 हजार 611 चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत.
Indian Medical Association (IMA) demands a special central law on violence against doctors, nurses, health care workers, and hospitals by an ordinance. IMA to observe 'white alert' on 22nd April. pic.twitter.com/fVh2HDFsu7
— ANI (@ANI) April 20, 2020
सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या 81 टक्के रुग्णांना कुठलीही लक्षणं आढळलेली नाहीत. म्हणजेच लक्षणं दिसत नसली तरी कोरना असू शकतो हे आता स्पष्ट झालं आहे.
सापळ्यात पकडणाऱ्यांना शिताफीने दिला चकमा,बिबट्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
धारावीत 30 नवे रुग्ण आढळले त्यामुळे धारावीतल्या एकूण रुग्णांची संख्या 168वर गेली आहे. सगळ्यात जास्त रुग्ण 5 हे शास्त्रीनगर मध्ये तर आठ रुग्णांचा पत्ता शोधून काढण्याचे काम सुरू आहे. आज एकही नव्या मृत्यूची नोंद नाही. धारावीत आत्तापर्यंत 11मृत्यू झाले आहेत.
जगभर कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण येत आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांमध्ये त्यांची संख्या थोडी कमी झाली आहे. जगभर रविवारी 75,471 नवे रुग्ण सापडले त्यामुळे जगातल्या एकूण रुग्णांची संख्या 24,03,410 एवढी झाली आहे. तर रविवारी जगभर 5 हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 1,65,216 एवढी झाली आहे.
अमेरिकेतल्या कोरोना मृतांचा आकडा 40 हजार 683 एवढा झालाय. तर 7 लाख 59 हजार 786 एवढे लोक कोरोनाबाधित आहेत. 70 हजार 980 लोग बरे झाले आहेत. इटलीत आत्तापर्यंत 23 हजार 660 लोकांचा मृत्यू झालाय. तर 1 लाख 78 हजार 972 जण बाधित आहेत. स्पेनमध्ये 2 लाख 210 लोक बाधित आहेत. तर 20 हजार 852 लोकांचा मृत्यू झाला आहे.
फ्रांसमध्ये 19 हजार 718 लोकांचा मृत्यू झालाय. तर 1 लाख 52 हजार 894 जण बाधित आहेत. ब्रिटेनमध्ये 16 हजार 60 जणांचा मृत्यू झालाय. तर 1 लाख 20 हजार 67 जण बाधित आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.