Home /News /news /

Coronavirus: भारतात कोरोनाची 227 नवी प्रकरणं, एकूण संख्या 1251 वर

Coronavirus: भारतात कोरोनाची 227 नवी प्रकरणं, एकूण संख्या 1251 वर

32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे.

    नवी दिल्ली, 31 मार्च : कोरोनाव्हायरस देशात फैलाव वाढत आहे. सोमवारी लॉकडाउनचा 6 वा दिवस होता, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच गेली. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात 216 लोक संसर्गित झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला. भारतात कोरोना तिसर्‍या टप्प्यात पोहोचला नाही सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाने अद्याप फार डोके वर काढलेले नाही. तिसऱ्या टप्प्यात पोहोचला नाही. 21 दिवसांचा लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची तातडीची योजना नाही, असे सोमवारी सरकारने सांगितले आहे. भारतीय सैन्याने पुढील महिन्यात संभाव्य आणीबाणीच्या घोषणेविषयी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेली 'बनावट' पोस्ट नाकारलं आहे. हे वाचा - Coronavirus : 'हस्तमैथुन करा', अमेरिकेत सरकारने नागरिकांना दिला सल्ला सोमवारी राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांत कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. दिल्ली पोलिसांनी आज निजामुद्दीनमधील एका मोठ्या भागाला वेढलं आहे, जेथे काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या व्यक्तिला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. तेलंगणात 6 जणांचा मृत्यू अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगी न घेता सुमारे दोनशे जणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेलंगणमधील सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत या कार्यक्रमात येणार्‍या लोकांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. दिल्ली सरकारकडून सांगण्यात आले आहे की नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम एक पृथक केंद्र बनविण्यात आले आहे, आवश्यकतेनुसार या लोकांना तिथे ठेवले जाईल. हे वाचा - कोरोनाच्या लढ्यात नाम फाऊंडेशनकडून 1 कोटींची मदत, सहकार्य करण्याच नानांचं आवाहन इतर देशाप्रमाणे भारतात संक्रमण कमी सोमवारी पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, भारतात संक्रमित रूग्णांची संख्या 100 ते 1000 पर्यंत पोहोचण्यासाठी 12 दिवस लागले, तर या संकटात ग्रस्त विकसित देशांमध्ये या काळात रूग्णांची संख्या 3,500 ते 8,000 इतकी होती. संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या आधारे, अग्रवाल म्हणाले की, विकसित देशांपेक्षा भारतात संक्रमणाच्या वाढीची गती कमी आहे. हे वाचा - अंत्यसंस्कारासाठी पोटच्या लेकराचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमी पायपीट
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या