Home /News /national /

कोरोनाचं भयावह वास्तव! अंत्यसंस्कारासाठी पोटच्या लेकराचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमी पायपीट

कोरोनाचं भयावह वास्तव! अंत्यसंस्कारासाठी पोटच्या लेकराचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमी पायपीट

देशभरात लॉकडाऊन असल्याने वाहतूक व्यवस्था बंद आहेत. यात ही हादरवणारी घटना समोर आली आहे

    अनंतपूर (आंध्रप्रदेश), 30 मार्च : सध्या देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 24 मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये वाहतूक व्यवस्था बंद असल्याने एका बापाला आपल्या 5 वर्षांच्या मुलाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी 88 किमी अंतराची पायपीट करावी लागली. हे छायाचित्र अंगावर काटा आणणारे आहे. कोरोना व्हायरसचा (Covid - 19) संसर्ग वाढू नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे. याचे पालन व्हावे यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. लोकांना गर्दी करण्यास मज्जाव आहे. याशिवाय अनेक मजुरांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागल्याचे वृत्त समोर येत आहे. या सर्व घटना अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. संबंधित -  चीनमध्ये कोरोनावर विजय मिळवल्याचा आनंद; कुत्रा-मांजर, वटवाघुळाच्या मांसची पार्टी ही घटना आंध्रप्रदेशातील अनंतपूर (Anantpur) जिल्ह्यातील आहे. बुधवारी या व्यक्तीच्या 3 वर्षांच्या मुलाचे निधन झाले. हा व्यक्ती आंध्रप्रदेशातील गोरंटला या एका लहानशा गावात राहतो. लॉकडाऊनमुळे येथील सर्व वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी या बापाला 88 किमी चालत प्रवास करावा लागला. भारतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या सगळ्यात भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 102 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं कोरोनाला हरवणे शक्य असल्याची चिन्हे दिसत आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यास लॉकडाऊनचे नियमही शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास बऱ्याच अंशी कमी होईल. संबंधित - तू प्लीज घरी ये, पत्नीनं नकार म्हणून लॉकडाऊनमध्ये तरुणानं केली आत्महत्या
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या