Coronavirus : 'हस्तमैथुन करा', अमेरिकेत सरकारने नागरिकांना दिला सल्ला

Coronavirus : 'हस्तमैथुन करा', अमेरिकेत सरकारने नागरिकांना दिला सल्ला

लोकांनी लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडू नये हे सांगण्यात आलं पण आता वेळ कसा घालवायचा असा प्रश्न लोकांसमोर आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 30 मार्च : जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे काही देशांनी लॉकडाउनही केलं आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, खाजगी कंपन्या, कार्यालये याशिवाय इतर अनेक व्यवहार बंद असल्यानं सर्वच लोक घरांमध्ये बंद आहेत. ज्यांचे काम घरातून कऱणं शक्य आहे ते वर्क फ्रॉम होम करत आहेत. बाकी उरलेल्या लोकांना मात्र घरात बसण्याशिवाय मार्ग नाही. अशा वेळेत पहिल्या दोन-चार दिवसांनंतर त्यांना कंटाळा येऊ लागला. यावर काहींनी बैठे खेळ, नवीन काहीतरी शिकायला सुरुवात केली. याशिवाय टीव्ही, वेबसिरीज यांचाही पर्याय लोकांना मिळाला आहे.

लोकांनी लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडू नये हे सांगण्यात आलं पण घरात वेळ कसा घालवायचा असा प्रश्न लोकांसमोर आहे. अमेरिकेतही कोरोना वेगाने पसरत आहे. या परिस्थितीत घरात अ़डकलेले लोक कुटंबासोबत वेळ घालवत आहेत. तर काही लोक छंद जोपासत आहेत. मात्र, अमेरिकेतील न्यूयॉर्क सरकारने नागरिकांना चक्क हस्तमैथून करण्याचा सल्ला दिला आहे.

सध्याच्या या कठीण कालात लैंगिक आरोग्याचा अभ्यास कऱण्यात येत आहे. त्यांनी तणाव कमी करण्यासाठी हा उपाय सुचवला आहे. न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्यानं ट्विटही केलं आहे. त्यात म्हटलंय की, किस घेतल्यानं कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. इतर कोणी नाही तर तुम्हीच तुमचे सुरक्षित सेक्स पार्टनर आहात. साबणाने सेक्स टॉयज आणि हात स्वच्छ धुवत असाल तर आणि हस्तमैथुन करत असल्याच कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही.

आतापर्यंत अनेक लैंगिक अभ्यास अहवालातून हस्तमैथुन फायदेशिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. हस्तमैथुन केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक फायदा होतो असंही संशोधकांनी म्हटलं आहे. हस्तमैथुनामुळं तणाव कमी होतो, चांगली झोप लागते आणि त्याचसोबत लक्ष केंद्रीत होण्यासही मदत होते. एवढंच नाही तर लैंगिक क्षमता वाढण्यासाठीही हस्तमैथुनाने मदत होते असंही काही अभ्यासांमधून समोर आलं आहे.

हे वाचा : CoronaVirus : लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त, UNICEF ने सांगितलं घरात बसून काय करायचं

 

Published by: Suraj Yadav
First published: March 30, 2020, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading