Home /News /maharashtra /

धक्कादायक! अंत्यसंस्कारानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आणि...

धक्कादायक! अंत्यसंस्कारानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आणि...

गावातील 30 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्या सर्वांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

  सांगली, 23 एप्रिल : जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात एक धकाकादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तिवर अंत्यसंस्कार झाल्यानतंर तो कोरोना पॉझिटिव्ह होता हे समजल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर गावातील 30 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्या सर्वांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी गावातील एक व्यक्ती मुंबईत हृदयाच्या आजारावर उपचारासाठी आठवड्यापुर्वी गेली होती. 18 एप्रिलला त्या व्यक्तीचे निधन झाले. त्याचदिवशी मृतदेह रुग्णवाहिकेतून गावी आणण्यात आला आणि 19 एप्रिलला अंत्यसंस्कार करण्यात आले. हे वाचा-'कोरोना कधी जीव घेईल काय माहित', डॉक्टर दाम्पत्यानं बनवलं लेकासाठी मृत्यूपत्र अंत्यसंस्कार झाल्यानंतर तीन दिवसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी मुंबईच्या रुग्णालयात कोरोना टेस्टच्या रिपोर्टबाबत विचारणा केली. रुग्णालयाने रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. याबाबची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर तालुका प्रशासनासह आरोग्य विभागाने थेट गाव गाठले. त्यानंतर मृतदेह आणण्यापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन कऱण्यात आलं आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 21 हजार 393 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 हजारहून अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 681 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 257 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला आहे. हे वाचा-महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली, बारामतीत पोलिसाची कॉलर पकडली

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Sangali, Symptoms of coronavirus

  पुढील बातम्या