मुंबई, 10 एप्रिल : महाराष्ट्राची राजधानी मुंबईला कोरोनाने विळखा घातला आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मुंबईचं ह्रदयस्थान असलेल्या दादरमध्ये आज 3 नवे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये 2 परिचारिकांचा समावेश आहे.
दादरमध्ये आज 3 नवे रुग्ण आढळले आहे. यामध्ये शुश्रुषा रुग्णालयातील 2 परिचारिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या परिचारिकांचं वय अनुक्रमे 27 आणि 42 आहेत. तर केळकर रोडवर राहणाऱ्या एका 83 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दादरमध्ये एकूण 6 जण कोरोनाबाधित झाले आहे. याआधी पहिला रुग्ण हा शिवाजी पार्क परिसरात आढळून आला आहे.
हेही वाचा - नागपुरात कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण, घरातील एकाचा कोरोनाने मृत्यू
आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्य, कर्मचारी आणि नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
धारावीमध्ये 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले
दरम्यान, धारावीमध्ये आज सकाळी कोरोनाबाधित आणखी 5 नवे रुग्ण आढळले आहे. या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. धारावीत आता एकूण रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी दोघेजण हे तबलिगी जमातीच्या संपर्कात आलेले होते. पोलिसांच्या यादीत या दोघांच्या नावाचा समावेश होता. त्यांची तपासणी केली असता पॉझिटिव्ह निघाले आहेत.
हेही वाचा -एप्रिल अखेरीस कोरोनापासून होणार सुटका? असा आहे मोदी सरकारचा प्लॅन
दरम्यान, हे दोघेही राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं आयसोलेटेड करण्यात आलेलं होतं. धारावीतील ज्या भागात जास्त संशयित आढळतील तो भाग हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ड्रोनच्या मदतीने संपूर्ण धारावीचे सॅनिटायझेशन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनकडून दीडशे डॉक्टर देण्यात येणार आहेत. ज्यांच्या मदतीने संपूर्ण धारावीतील लोकांचे स्क्रीनिंग केले जाईल, अशी माहिती आहे.
संपादन - सचिन साळवे