Home /News /news /

मृत्यू समोर दिसत असतानाही 90 वर्षांच्या आजीने व्हेंटिलेटर दिलं तरूण रूग्णाला

मृत्यू समोर दिसत असतानाही 90 वर्षांच्या आजीने व्हेंटिलेटर दिलं तरूण रूग्णाला

90 वर्षांचं सुंदर आयुष्य मी जगले आहे. आता कशातही माझं मन नाही. मला व्हेंटिलेटर लावू नका. त्याऐवजी एखाद्या तरूण रूग्णाला ते लावा.

    ब्रुसेल्स 02 एप्रिल: कोरोना व्हायरसविरुद्ध आज सगळं जग लढत आहे. डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहे. पण संकटच एवढं मोठं आहे की सगळी साधनं अपुरी पडत आहेत. असं कुठलं संकट येईल याची कल्पनाही कुणी केले नव्हती. त्यामुळे जगभरच संरक्षक सुट्स, मास्क आणि व्हेंटिलटर्सची कमतरता आहे. अशी परिस्थिती असताना बेल्जियमच्या एका 90 वर्षांच्या आजीबाईंनी व्हेंटिलेटर नाकारलं आणि मृत्यूला स्वीकारलं. त्यांनी सगळ्यांनाच एक आदर्श घालून दिला. त्यांच्या या कहाणीने जगभरातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आणलंय. ‘डेली मेल’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बेल्जियमच्या बेनकॉम या शहरात सुझैन होलअर्टस या आजीबाई राहतात. त्या 90 वर्षांच्या आहेत. घरी असतानाही त्यांना कोरोनाने ग्रासले. आजीबाईंना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. वय 90 असलं तरी आजीबाईंचं सगळ्या घडामोडींवर लक्ष होतं. हॉस्पटल्समध्ये व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे हे त्यांना माहित होतं. उपचार सुरू असतानाच त्यांचा श्वसनाचा त्रास वाढत होता. आपला मृत्यू अटळ आहे हे त्यांना कळालं होतं. मृत्यू समोर दिसत असतानाच त्यांनी उचार करणाऱ्या डॉक्टरांना आपली इच्छ बोलून दाखविली. हे वाचा -  माझीसुद्धा ड्युटी लावा, मला कोरोनाशी लढायचं आहे', वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र त्या म्हणाल्या 90 वर्षांचं सुंदर आयुष्य मी जगले आहे. आता कशातही माझं मन नाही. मला व्हेंटिलेटर लावू नका. त्याऐवजी एखाद्या तरूण रूग्णाला ते व्हेटिलेटर लावा. त्यानंतर काही तासांमध्येच त्यांचा मृत्यू झाला. आज्जींच्या या कृतीने डॉक्टर्सही भारावून गेले होते. आजींची ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. हे वाचा -  भयंकर... अमेरिकेत शवपेट्याही पडताहेत अपुऱ्या, दिली लाखभर ‘बॉडी बॅग’ची ऑर्डर जगात अमेरिका आणि कोरोनाचं मुख्य केंद्र झालं आहे. अमेरिकत न्यूयॉर्क शहर कोरोनामुळे कोलमडून पडलंय. मृतांची संख्या एवढी आहे की हॉस्पिटल्समधल्या सगळ्या जागा कमी पडत आहेत. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती असल्याने मृतदेह झाकायला आणि ठेवायला शवपेट्या आणि ‘बॉडी बॅग’ कमी पडत आहेत. त्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावायची कशी असा प्रशासनापुढे प्रश्न पडलाय. एकट्या न्यूयॉर्क शहरात 1,139 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत ही संख्या 5,115 एवढी झालीय. अमेरिकेत पुढच्या काही महिन्यांमध्ये तब्बल 2 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधनांचीही कमतरता आहे. सरकारने आपल्या आपत्कालीन साठ्यातून 50 हजार बॉडी बॅगची व्यवस्था करण्याची तयारी केली आहे. मात्र मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या बघता सरकारने आणखी 1 लाख बॅग्सची ऑर्डर दिली आहे. या बॅग 7.8 फुट लांब आणि 3.2 फुट रुंद असतात. युद्ध काळातल्या या बॅग आता कोरोनाविरुद्धच्या लढाईत वापरल्या जाणार आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या