Home /News /national /

'माझीसुद्धा ड्युटी लावा, मलाही कोरोनाशी लढायचं आहे', वैद्यकीय अधिकाऱ्याला लिहिलं पत्र

'माझीसुद्धा ड्युटी लावा, मलाही कोरोनाशी लढायचं आहे', वैद्यकीय अधिकाऱ्याला लिहिलं पत्र

रस्त्यावर पोलिस आणि दवाखान्यात डॉक्टर-नर्स कोरोनाला हरवण्यासाठी लढत आहेत. यासाठी अनेकांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे.

    नवी दिल्ली, 02 एप्रिल : देशात कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाउन केल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. लोकांना घरातच बसण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, रस्त्यावर पोलिस आणि दवाखान्यात डॉक्टर-नर्स कोरोनाला हरवण्यासाठी लढत आहेत. यासाठी अनेकांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. आता अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या काही डॉक्टर आणि नर्सनी कोरोनाग्रस्तांची सेवा कऱण्यासाठी माझीही ड्युटी लावा अशी मागणी केली आहे.  यासाठी त्यांनी मेडिकल सुपरिटेंडेंटला पत्र लिहिलं आहे. एम्सच्या एचडीयू वॉर्डमध्ये असलेले कनिष्क यादव गेल्या 7 वर्षांपासून सिनिअर नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करत आहेत. त्यांनी एम्सच्या मेडिकल सुपरिटेंडेंटना पत्र लिहिलं आहेत. त्यात म्हटलं की, गेल्या सात वर्षांपासून त्यांना आयसीयुमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आयसीयुची गरज असते. अशा परिस्थितीत जिथं एम्स ट्रामा सेंटर आहे. ज्याठिकाणी कोरोनाच्या रुग्णांसाठी खास तयारी करण्यात आली आहे तिथं ड्युटी लावण्यात यावी. कनिष्क यादव यांच्याशिवाय इतरही अनेक डॉक्टर आणि नर्स यासाठी पुढे आले आहेत. या संकटाच्या काळात त्यांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. कोरोनाला हरवण्यासाठी लढायचं आहे. यासाठीच डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने पुढे येऊन एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे वाचा : आधी लढा कोरोनाशी, लग्न नंतरही होईल! डॉक्टर तरुणीने रुग्णांसाठी पुढे ढकलला विवाह नवी दिल्लीतील एम्स ट्रामा सेंटरला कोरोनासाठी खास तयार केलं आहे. या रुग्णालयात 215 बेड तयार कऱण्यात आले आहेत. एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या अध्यक्षतेखाली आयसोलेशन आणि ट्रिटमेंट वॉर्ड तयार केले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालय, सफदरजंग नंतर एम्स ट्रामा सेंटरही सज्ज आहे. हे वाचा : लॉकडाउन कधी संपणार? पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत दिले संकेत
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या