पाकिस्तानचा धक्कादायक प्लान, कोरोना झालेल्या दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याची तयारी

पाकिस्तान वारंवार आपल्या मर्यादा ओलांडत आहे. खरंतर पाकिस्तानमध्येही कोरोनाने हाहाकार माजला आहे. परंतु एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 एप्रिल : जगातील प्रत्येक छोट्यातला छोटा देश हा सध्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याच्या गुंतला आहे. परंतु पाकिस्तान अद्यापही त्याचं वाईट कृत्यं करण्यापासून थांबला नाही आहे. पाकिस्तान वारंवार आपल्या मर्यादा ओलांडत आहे. खरंतर पाकिस्तानमध्येही कोरोनाने हाहाकार माजला आहे. परंतु एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एलओसीजवळ लॉन्चिंग पॅडवर जमा झालेल्या दहशतवाद्यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे हे दहशतवादी आता भारतात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तान सातत्याने त्यांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करीत आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी एलओसीलाही आगही लावण्यात आली आहे. पाकिस्तानची ही चाल गुप्तचर यंत्रनेमुळे लक्षात आली आहे.

मार्चमध्येच पाकिस्तानने 411 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला

पाकिस्तानने शुक्रवारी भारतीय सुंदरबानी भागात सैन्याच्या चौक्या लक्ष केल्या. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत. आकडेवारी पाहिल्यास मार्च महिन्यात पाकिस्तानने 411 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. आणि सन 2020 मध्ये आतापर्यंत तीन महिन्यांत 1160 पेक्षा जास्त वेळा युद्धबंदीचे उल्लंघन झाले आहे. अद्यापही हे उल्लंघन सुरूच आहे.

हे वाचा - कोरोनाच्या संकटामुळे एकही गिऱ्हाईक नाही, वेश्या व्यवसायावर आली उपासमारीची वेळ

गेल्या वर्षी, 2019 मध्ये पाकिस्तान सैन्याने पहिल्या तीन महिन्यांत 685 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. जर आपण पाकिस्तान सैन्यात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांबद्दल बोललो तर आतापर्यंत 40 हून अधिक पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत. यात पाकिस्तान लष्कराचे बरेच अधिकारीही आहेत. तर 860 पेक्षा जास्त लोक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत.

पंजाब प्रांतातील एलओसीकडून पाक सैन्याने घेतली माघार

पाकिस्तानमधील कोरोनाचे संकट इतके वाढले आहे की स्वत: इम्रान खान यांनीही हात वर केले आहेत. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकृती अस्वास्थ्य आणि वैद्यकीय परिस्थितीमुळे पाकिस्तानची मोठी संख्या एलओसीमधून काढून वेगवेगळ्या भागात तैनात केली जात आहे. पाकिस्तानमधील सर्वाधिक शक्तिशाली प्रांत पंजाबमधील कोरोना आपले पाय पसरू नये म्हणून बहुतेक लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

हे वाचा - #BREAKING राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 500च्या वर, रात्रभरात सापडले 47 नवे रुग्ण

अशा परिस्थितीत पाकिस्तान त्या दहशतवाद्यांना लॉन्चपॅडवर ठेवू शकत नाही किंवा त्यांना त्यांच्या घरी जाऊ देऊ शकत नाही. इतकेच नाही तर त्यांच्यावर उपचारही सुरू नाहीत. त्या कोरोना-संक्रमित अतिरेक्यांकडून पाकिस्तान लष्कराच्या सैनिकांनाही धोका आहे, अशा प्रकारे पाकिस्तान त्या संक्रमित दहशतवाद्यांना भारतात ढकलण्याची स्थितीत आहे आणि सतत युद्धबंदीचे उल्लंघन करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2020 02:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading