कोरोनाच्या संकटामुळे एकही गिऱ्हाईक नाही, वेश्या व्यवसायावर आली उपासमारीची वेळ

कोरोनाच्या संकटामुळे एकही गिऱ्हाईक नाही, वेश्या व्यवसायावर आली उपासमारीची वेळ

आपल्या शरीराची बोलू लावून या महिला दिवसाची भाकर मिळळत होत्या. पण आता हा व्यवसायचं बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

  • Share this:

नागपूर, 04 एप्रिल : कोरोनाव्हायरस या माहामारीला रोखण्यासाठी 24 मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे देशातील सगळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अगदी वेश्या व्यवसायसुद्धा बंद पडला आहे. आपल्या शरीराची बोलू लावून या महिला दिवसाची भाकर मिळळत होत्या. पण आता हा व्यवसायचं बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आपलं आणि कुटुंबाचं पोट कसं भरायचा असा मोठा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. खरंतर सेक्स वर्कर म्हटलं की पुरुषांची ती नजर स्त्रीलासुद्धा सजत असते. पण पोटाची खळगी भरण्यासाठी दुसरा पर्याय समोर नसतो.

नागपुरातील सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्यांना स्वत: च्या आणि त्यांच्या कुटूंबाच्या रोजच्या गरजा भागविण्यात अडचणी येत आहेत. यांच्यापैकी एकीने सांगितलं की, "आमच्याकडे खायला काही नाही. आम्ही आमच्यासारख्या गरजू लोकांना अन्न पुरवणाऱ्यांवर अवलंबून आहोत" एकमेकांना स्पर्श केल्याने कोरोनाची लागण होते. त्यामुळे वेश्या व्यवसायसुद्धा बंद पडला आहे.

हे वाचा - #BREAKING राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 500च्या वर, रात्रभरात सापडले 47 नवे रुग्ण

खरंतर, लैंगिक कामगार आणि ट्रान्सजेंडर लोक आपल्या देशात नेहमीच दुर्लक्षित होतात. अगदी सामान्य स्थितीतही, त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत या संकटाच्या काळात त्याचे आयुष्य अधिक कठीण झाले आहे. कोरोना विषाणूमुळे मुंबई, देह व्यापारासाठी प्रसिद्ध कामठीपुराचे रस्ते ओसाड पडले आहेत आणि तेथील लैंगिक कामगार म्हणून काम करणार्‍या हजारो महिलांची परिस्थिती भयानक बनत चालली आहे.

हा सलग आठवा दिवस आहे जेव्हा सेक्स वर्कर सोनी (49) चा एकच ग्राहक फिरकला नाही. नेपाळमधील सोनी गेली 25 वर्षे वेश्या व्यवसायाच्या काम करते. त्यांनी मुंबईस्थित हिंदी भाषेतील वृत्तसंस्थेला सांगितले की, "संपूर्ण आयुष्य इथेच गेलं, बरेच बॉम्ब स्फोट झाले, हल्ले झाले, किती आजार झाला, पण अशी परिस्थिती कधीच नव्हती."

हे वाचा - कोरोनाला हरवणारे खरे योद्धा, आईच्या मृत्यूचा फोन आला तरी आपल्या धरती मातेसाठी लढली

गेल्या रविवारीपासून त्याने एक रुपयाही कमवला नाही आणि पुढच्या काही दिवसांत परिस्थिती सुधारताना दिसत नाही. ती म्हणाली की, 'जर हे असंच चालत राहिलं तर मी काय खाणार, घरमालकाला मी भाडे कसं देणार? सोनी व्यतिरिक्त इतर तीन महिला तिच्याबरोबर खोलीत राहतात आणि त्यादेखील याच परिस्थितीत आहेत. त्या दिवसात दोन ते तीन हजार रुपये कमवायच्या. पण आता हातात साधी फुटकी कवडीही नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2020 01:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading