जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / #BREAKING राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 500च्या वर, रात्रभरात सापडले 47 नवे रुग्ण

#BREAKING राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 500च्या वर, रात्रभरात सापडले 47 नवे रुग्ण

#BREAKING राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 500च्या वर, रात्रभरात सापडले 47 नवे रुग्ण

भारतात या साथीचा कहर (Peak of pendemic) या महिन्याच्या अखेरीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 एप्रिल : राज्यात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 537 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात 47 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये रात्रभरात 28 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे तर ठाण्यामध्ये कोरोनाचे 15 नवे रुग्ण समोर आले आहेत. अमरावतीमध्ये 1, पुण्यात 2 तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या 1 रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या आकड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

जाहिरात

राज्यात एकूण 537 कोरोनाचे रुग्ण दाखल झाले. त्यातले 20 बरे झाले आहेत. मुंबई – 306 पुणे (शहर व ग्रामीण भाग)– 73 मुंबई वगळून मंडळातीत इतर मनपा व जिल्हे 69 सांगली – 25 नागपूर – 16 अहमदनगर – 20 बुलढाणा- 5 यवतमाळ – 4 सातारा – 3 औरंगाबाद – 3 कोल्हापूर – 2 रत्नागिरी – 2 वाशिम-1 सिंधुदुर्ग – 1 गोंदिया – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 उस्मानाबाद -1 अमरावती - 1 इतर राज्य (गुजरात) – 01 देशात रुग्णांचा आकडा 2902वर  राज्यातसह देशाचा आकड्यातही वाढ झाली आहे. भारताने कोरोनाला रोखण्यासाठी वेळीच सुरक्षित पाऊलं उचलली असतानाही कोरोनाचा फैलाव वेगाने वाढला आहे. भारतामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 601 नवी प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर आता देशात रुग्णांचा आकडा हा 2902वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा हा वाढता आकडा खऱंतर नागरिकांची चिंता वाढवणारा आहे. ‘मला 3 वर्षाची मुलगी आहे, माझ्या घरात वृद्ध आई-वडील आहे’ पोलिसांचा VIDEO व्हायरल शनिवारी जारी केलेल्या अहवालानुसार, मागच्या 24 तासांमध्ये देशात 601 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. म्हणजेच प्रत्येक दोन मिनिटाला एक व्यक्ती कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहे. आतापर्यंत भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2902 पर्यंत वाढली आहे. त्यामध्ये 2650 सक्रिय प्रकरणं तर 183 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मृतांची संख्या 68 वर पोहोचली आहे. अशी अधिकृत माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे. खरा धोका एप्रिलअखेरी भारतात या साथीचा कहर (Peak of pendemic) या महिन्याच्या अखेरीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लॉक डाउन संपलं तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत. इटली आणि स्पेनमध्ये जे आत्ता घडत आहे तसा वेगाने फैलाव आणि वाढता मृत्युदर रोखायचा असेल तर घरात राहणं याला पर्याय नाही, असं तज्ज्ञ सांगतात. गर्दी टाळली तरच या विषाणूचं संक्रमण आटोक्यात राहील. भारतासारख्या देशात लोकसंख्या आणि राहण्याची पद्धत लक्षात घेता कोरोनाची साथ उग्र रूप धारण करू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नमाज पठण रोखल्याने पाकिस्तानी पोलिसांवर जीवघेणा हल्ला, घटनेचा थरारक VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात