कोरोना लशीमुळे देशात पहिला मृत्यू; म्हणून महत्त्वाची आहेत लस घेतल्यानंतरची ती 30 मिनिटं

कोरोना लशीमुळे (Corona vaccine) एका व्यक्तीचा मृत्यू (Death after corona vaccination) झाला याचा अर्थ कोरोना लस सुरक्षित नाही असा नाही. त्यामागील नेमकं कारण समजून घ्या.

कोरोना लशीमुळे (Corona vaccine) एका व्यक्तीचा मृत्यू (Death after corona vaccination) झाला याचा अर्थ कोरोना लस सुरक्षित नाही असा नाही. त्यामागील नेमकं कारण समजून घ्या.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 जून : देशात कोरोना लशीमुळे पहिला मृत्यू झाला (Corona vaccination death) त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. आधीपासूनच कोरोना लस ( Death after Corona vaccination) घेण्यास लोक घाबरत आहेत, त्यात मृत्यूची बातमी समोर आल्याने ही भीती आणखी वाढली आहे. कोरोना लशीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला याचा अर्थ कोरोना लस सुरक्षित नाही असा नाही. कोरोना लशीमुळे झालेला हा मृत्यू नेमका का झाला? त्यामागे नेमकं काय कारण आहे हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत तसे लशीचे सौम्य दुष्परिणाम दिसून आले आहेत. पण मृत्यूची घटना मात्र पहिल्यांदाच घडली आहे. कोरोना लशीमुळे मृत्यू झाल्याची माहिती खुद्द केंद्र सरकारनेच दिली आहे. सरकारकडून नेमलेल्या समितीने कोरोना लशीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. हे वाचा - 84 ऐवजी 28 दिवसांनी घेऊ शकता कोरोना लशीचा दुसरा डोस; या मुंबईकरांना BMC ची मुभा लसीकरणानंतर एखाद्या व्यक्तीला झालेल्या कोणत्याही त्रासाला AEFI म्हणजेच एडवर्स इवेंट फॉलोइंग इम्युनाइजेशन असं म्हटलं जातं. सरकारकडून अशा AEFI च्या प्रकरणांसाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीने कोरोना लसीकरणामुळे उद्भवलेल्या समस्यांचाही अभ्यास केला आहे.  या समितीनेच कोरोना लशीमुळे झालेल्या मृत्यूची माहिती दिली आहे. अहवालानुसार, 8 मार्च 2021 रोजी लसीकरणानंतर एका 68 वर्षीय व्यक्तीचा एनाफिलेक्सिसमुळे (Anaphylaxis) मृत्यू झाला. हे गंभीर असं अॅलर्जिक रिअॅक्शन आहे. नॅशनल AEFI समितीचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं, "कोरोना लशीमुळे देशात पहिला मृत्यू झालं आहे आणि याचं कारण आहे ते एनाफिलेक्सिस. यावरून कोरोना लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावरच 30 मिनिटं थांबणं का गरजेचं आहे, याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित होतं. बहुतेक एनाफिलेटिक्ट रिअॅक्शन याच कालावधीत दिसून येतात. त्याचवेळी योग्य उपचार मिळाले तर मृत्यूचा धोका टाळता येतो" हे वाचा - ICMR चा Alert: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून सावधान! बचावासाठी हाच उपाय कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर एईएफआय झाल्याच्या घटना एकूण लसीकरणाच्या केवळ 0.01 टक्के एवढ्या आहेत. तर यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या एईएफआयच्या आकडेवारीनुसार 16 जानेवारी ते 7 जून दरम्यान 26,200 प्रकरणांची नोंद झाली आहे. एनाफिलेक्सिसच्या इतर 2 घटनांमध्ये 19 आणि 16 जानेवारी लसीकरण करण्यात आलेल्या दोन व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र उपचारानंतर ते बरे झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published: