ICMR चा Alert: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी ही पावलं उचलणं अत्यंत आवश्यक

ICMR चा Alert: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी ही पावलं उचलणं अत्यंत आवश्यक

Coronavirus च्या Delta + या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी ICMRकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून : सध्या संपूर्ण देशात कोरोना आकडेवारी  (Corona Update) हळू हळू कमी होत चालली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये अनलॉक (Maharashtra unlock) सुरू आहे. मोठ्या बाजारपेठांमध्ये नागरिकांनी परत गर्दी करणं सुरू केलंय. मात्र कोरोनच्या तिसऱ्या अजूनही कायम आहे. त्यात भर म्हणून आता 'Delta ' व्हेरिएंट (Delta variant)  आलं आहे. याचा धोका सर्वात जास्त आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी ICMRकडून सूचना  देण्यात आल्या आहेत.

कोरोना व्हायरसच्या या 'Delta ' व्हेरिएंटकडे दुर्लक्ष कडून चालणार नाही.  28 प्रयोगशाळांमध्ये या व्हेरिएंटवर संशोधन सुरु आहे. हे व्हेरिएंट किती धोकादायक आहे यावर शोध सुरु आहे. मात्र या व्हेरिएंटचे रुग्ण कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असं ICMR कडून सांगण्यात आलंय.

गेल्या दीड वर्षांपासून आपण कोरोना व्हायरसचा सामना करत आहोत अंतर आपण त्याला हरवू शकलो नाही. कोरोना व्हायरस अजूनही थकलेला नाही. नवनवीन व्हेरिएंट्समध्ये तो येत आहे. आपल्याकडे या व्हेरिएंट्सना संपवण्याचं शस्त्र नाहीये. मात्र कोरोनाचे नियम पाळणं आवश्यक आहे असं डॉक्टर विनोद कुमार पॉल (VK Paul) त्यांनी म्हंटलंय.

हे वाचा -LIVE : 2024 नंतर राज्यात भाजपचीच सत्ता - रावसाहेब दानवे

जर कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटला थोपवून लावायचं असेल तर आपल्याला नेहमीप्रमाणे मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचं पालन करणे, कंटेनमेंट झोन (Containment zones) तयार करणे आणि जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण (Corona vaccination) करणे हे उपाय आहेत. तसंच जबाबदारी आणि शिस्त या दोन गोष्टी यात महत्वाच्या आहेत असंही ते म्हणाले.

संपूर्ण देशात सध्या अनलॉक होतंय. मात्र कोविड मॅनेजमेंट, चाचणी (Corona testing), कॉन्टॅक्ट ट्रेंसिन्ग, उपचार आणि लसीकरण (Corona vaccination)  या ५ महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तरंच हा नव्या व्हेरिएंटला आपण थोपवू शकू असं डॉक्टर अग्रवाल यांनी म्हंटलंय.

पुढील आठवड्यापासून देशात लसीकरणाला अधिकच वेग येणार आहे. तसंच लसीकरण मोफत असल्यामुळे नागरिकांना याचा लाभ घेता येणारआहे असंही ICMR च्या अधिकाऱ्यांनी म्हंटलंय.

Published by: Atharva Mahankal
First published: June 15, 2021, 5:50 PM IST

ताज्या बातम्या