84 ऐवजी 28 दिवसांनी घेऊ शकता कोरोना लशीचा दुसरा डोस; 'या' मुंबईकरांना BMC नी दिली मुभा

84 ऐवजी 28 दिवसांनी घेऊ शकता कोरोना लशीचा दुसरा डोस; 'या' मुंबईकरांना BMC नी दिली मुभा

मुंबईत कोरोना लसीकरणाच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 जून : कोरोना दोन डोस (Corona vaccine) घेणं अनिवार्य आहे. पण या दुसरा डोस (Corona vaccine second dose) हा पहिला डोस घेतल्यानंतर एका ठराविक अंतराने दुसरा डोस दिला जातो. शिवाय दोन्ही डोस हे सारख्याच कोरोना लशीचे घ्यावे लागत आहेत. कोविशिल्ड (Covishield) कोरोना लशीसाठी कमीत कमी अंतर सध्या 84 दिवस आहे आणि हा कालावधी खूप मोठा आहे.  अशात पहिला डोस घेतल्यानंतर काही कारणामुळे परदेशात जावं लागलं तर काय? असा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत मुंबईकरांना (Corona vaccination in mumbai) मोठा दिलासा मिळाला आहे. परदेशात जाण्याची गरज असलेल्या मुंबईकरांसाठी लशीच्या दोन डोसमधील हे अंतर कमी करण्यात आलं आहे.

शिक्षण, नोकरीसाठी परदेशात जाणारे नागरिक किंवा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू, अधिकारी  यांना कोविशिल्ड लशीच्या दुसरा डोस घेण्याचा कालावधी शिथील करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या 7 जून 2021 च्या परिपत्रकानुसार मुंबई महापालिकेनेही (BMC) लसीकरण नियमात बदल केला आहे.

परदेशात जाणाऱ्या मुंबईकरांना कोविशिल्ड कोरोना लशीचा दुसरा डोस 28 दिवसांनी घेता येईल सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशी हे डोस दिले जातील. महापालिकेच्या सहा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये कस्तुरबा, केईएम, सेव्हन हिल्स, कुपर, शताब्दी, राजावाडी आणि दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्राचा समावेश आहे. इथं थेट जाऊन लस घेता येईल. आधीच अपॉइटमेंट घेण्याची गरज नाही.

हे वाचा - मेड इन इंडिया असूनही Covaxin सर्वात महाग का? भारत बायोटेकने सांगितलं कारण

पण या नागरिकांना काही पुरावे सादर करावे लागतील.

18 ते 44 वयोगटागीतल व्यक्ती उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्यास परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचं निश्चितीपत्र, परदेश व्हिसा, व्हिसासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेलं I-20 किंवा  DS-160 अर्ज सादर करावेत.

आधी परदेशात शिकत असलेले विद्यार्थी जे भारतात आले आहेत आणि आता पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा परदेशी जाणार आहेत, त्यांनी संबंधित  विद्यापीठाचं अधिकृत कागदपत्रे असावेत.

नोकरीसाठी जाणाऱ्यांकडे सदर संस्थेचं ऑफर लेटर, मुलाखत पत्र आणि संस्थेच्या प्रमुखाचं पत्र असावं.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे खेळाडू किंवा संंबधित अधिकारी यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाचे अधिकृत पत्र असणं अनिवार्य आहे.

हे वाचा - कोरोना लस घेतल्यावर 68 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू; देशात पहिल्याच घटनेची नोंद

लस दिल्यानंतर लस प्रमाणपत्रात पासपोर्टचा क्रमांक असणं आवश्यक आहे. पहिला डोस घेताना पासपोर्ट पुरावा म्हणून घेतला नसल्यासं संबंधित लसीकरण केंद्रावर वेगळं लस प्रमाणपत्र दिलं जाईल. जागतिक आरोग्य संघटनेनं  कोविशिल्ड लशीचा आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे लस प्रमाणपत्रावर फक्त कोविशिल्डचा उल्लेख आंतरराष्ट्रीय प्रावसासाठी पुरेसा आहे. दरम्यान ही सवलत फक्त 31 ऑगस्ट 2021 पर्यंतच असेल.

Published by: Priya Lad
First published: June 15, 2021, 5:21 PM IST

ताज्या बातम्या