मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /उमेदवारासाठी कायपण! कोविड सेंटरमधून PPE कीट घालून मनसेची महिला सदस्य आली मतदानाला अन्...

उमेदवारासाठी कायपण! कोविड सेंटरमधून PPE कीट घालून मनसेची महिला सदस्य आली मतदानाला अन्...

 या प्रकरणामुळे इतर सदस्य आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणामुळे इतर सदस्य आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणामुळे इतर सदस्य आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भिवंडी, 22 ऑगस्ट : भिवंडी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून  प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत असताना भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत कार्यालयात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. मतदान करण्यासाठी मनसेची महिला सदस्य थेट कोविड सेंटरमधून पोहोचली होती.

भिवंडीत ग्रामपंचायत उप सरपंचाची निवडणूक होती. त्यासाठी सदस्यांना मतदानासाठी बोलावण्यात आले असता मनसेची महिला सदस्या थेट कोविड 19 सेंटरमध्ये उपचार घेत असतांना पीपीई किट घालून  मतदान करण्यासाठी  ग्रामपंचायत कार्यालयात आल्या असताना एकच खळबळ माजली होती. त्यावेळी सरपंच पराग पाटोळे यांनी विरोध करीत त्यांना जाण्यास सांगितले. तरीही तब्बल 20 ते 25 मिनिटे त्या तिथेच बसून राहिल्या अखेर पोलिसांना बोलावून त्यांना मतदान करू दिले नाही.

बापाच्या कृत्याने मुलगी हादरली, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ढसाढसा रडली, आणि...

मात्र, भिनार येथील कोविड 19 सेंटर केंद्रातून  सोडण्यात आलेच कसे असा प्रश्न निर्माण झाला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे इतर सदस्य आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या निवडणुकीत भाजपचे 5 सदस्य तर मनसेचे 3आणि शिवसेनेचे 7 असे 15 सदस्य असून भाजपच्या वतीने प्रणिती जगे तर मनसेच्या वतीने श्वेता बिडवी यांच्यामध्ये निवडणूक झाली. मात्र, शिवसेना आणि मनसेची युती झाल्याने मनसेच्या श्वेता बिडवी विजयी झाल्या आहेत. मात्र, मनसेच्या सदस्या मतदानासाठी आल्याने मनसेचा कोरोनाचा धोका गांभीर्याने घेत नसल्याचे भिवंडीत पाहावयास मिळाले आहे.

First published:

Tags: MNS