भिवंडी, 23 ऑगस्ट : भिवंडी शहरात मुलगी आणि बापाच्या नात्याला काळिमा फसणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पोटच्या 13 वर्षीय मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तब्बल 2 महिने बापाने अत्याचार केला.
अखेर मुलीचा संयम सुटल्याने तिने शांतीनगर पोलीस ठाण्यात बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने नराधम बापाच्या पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले आहे. या घटनेने शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राशीभविष्य : तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गैबीनगर येथील 13 वर्षीय मुलगी घरातून पळून थेट शांतीनगर पोलीस ठाण्यात आली आणि मोठमोठ्याने रडू लागली त्यावेळी पोलिसांनी विचारले असता पोलिसांना एकच धक्का बसला. त्यावेळी त्या पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, 'मला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन सख्या बापानेच जुलै आणि ऑगस्ट दोन महिने अत्याचार केला.
गणरायाचं घरोघरी उत्साहात स्वागत, कोरोनाचं विघ्न दूर करण्यासाठी भाविकांचं साकडं
सावत्र आई बाहेर गेली की, अत्याचार करत असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी नराधम बापाच्या विरोधात भादंवि 376,354,323,504,506 व पॉस्को अॅक्ट 4,6,8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
चिमुरडीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि घरी जाऊन या नराधम बापाला घरी जाऊन अटक केली. त्यानंतर या आरोपीला न्यायालयात हजर केले असता 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास एपीआय अमोल मोरे करीत आहे.