जालन्यातून आली SRP जवानांबद्दल खळबळजनक बातमी, प्रकरण थेट पोलिसांकडे!

कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:
जालना, 07 मे :  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत आहे. अशातच कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.  जालन्यात 6 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 2 जवानांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी  पोलीस आणि राज्य राखीव दलाचे आपले जवान जीवाची बाजी लावत आहे. पण, पोलीस आणि जवानांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जालन्यात राज्य राखीव दलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हे दोन्ही जवान मालेगावमध्ये बंदोबस्तावर होते. पण, हे दोन्ही जवान मालेगाव बंदोबस्तावरून पळून आल्याचं खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही जवानांविरोधात सदर बाजार पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हेही वाचा - रियाज नाइकूच्या खात्म्यानंतर पूर्ण झालं NSA अजित डोभालांचं ऑपरेशन 'जॅकबूट' जालना जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतांनाच सहा दिवसांपूर्वी अचानक जिल्ह्यात 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हावासियांमध्ये खळबळ उडाली होती. या पाचपैकी 4 रुग्ण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीनमधील जवानांचा समावेश होता. दरम्यान, ते जवान मालेगाव येथे बंदोबस्तावरुन परतलेले होते. दरम्यान, त्यापैकी 2 जवान मालेगाव येथे बंदोबस्त ड्युटीवरून कोणालाही न सांगता पलायन करून परस्पर जालन्यात परतल्याचं खळबळजनक प्रकार उघडकीस आला. हेही वाचा -विशाखापट्टणम हादरलं! गॅस गळतीमुळे 4 जणांचा मृत्यू, 2 हजार लोकांची प्रकृती बिघडली   याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाचे निरीक्षक जगताप यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कौळासे करीत आहे. संपादन - सचिन साळवे
First published: