नवी दिल्ली 07 मे: काश्मीर खोऱ्यात दहशतवादी रियाज नाइकू मारला गेला आणि सुरक्षा दलांना एक मोठं यश मिळालं. गेल्या 8 वर्षांपासून सुरक्षा दलांना चकमा देत होता आणि त्याच्यावर 12 लाखांचं बक्षिस होतं. पोलीस आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करत त्याने काश्मीरमध्ये अनेक कारवाया केल्या होत्या. दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत रियाझ मारला गेला. दहशवाद्यांना रियाझच्या खात्म्यामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं ऑपरेशन ‘जॅकबूट’ हे पूर्ण झाल्याचं बोललं जातं आहे. रियाझ हा आपल्या मूळ गावी कुटुंब आणि गावकऱ्यांना भेटण्यासाठी आला होता. हीच वेळ साधत सुरक्षा दलांनी त्याला टिपलं. दहशतवादी संघटनेत गेल्यानंतरही त्याला आपलं कुटुंब आणि गावकऱ्यांची ओढ लागत असे. त्यामुळेच या वेळी तो आला असताना फसला आणि मारला गेला. गेल्या काही वर्षात सुरक्षा दलांनी सुनियोजित अभियान राबवत दहशतवादी म्होरक्यांना टिपलं होतं. सुरक्षा दलांचं हे अभियान म्हणजे NSA अजित डोभाल यांचीच व्हुव्हरचना असल्याचं बोललं जातंय. त्याला ऑपरेशन ‘जॅकबूट’ हे नाव देण्यात आलं होतं. कर्तव्यावर असलेल्या कोरोना योद्ध्याला भरधाव ट्रकने चिरडलं; जागीच सोडले प्राण या ऑपरेशनसाठी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांची हिटलिस्ट तयार केली होती. त्यात बुऱ्हान वाणीसहीत अनेक दहशतवाद्यांचा समावेश होता. त्यात नायकूचं शेवटचं नाव होतं असं म्हटलं जातं. या यादीत सबजार भट्ट, अफाकुल्लाह, आदिल खांडे, सद्दाम पद्दार, वसीम माला, नसीर पंडित, इशफाक हमीद, तारिक पंडित, वसीम शाह आणि अनीस यांच्यासारख्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश होता. गर्लफ्रेंड्स आणि कुटुंबाचा नादच करतोय काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा त्यासाठी डोभाल हे स्वत: माहिती पुरवत होते आणि सुरक्षा दलाला त्यांचं मार्गदर्शन आणि खास इनपूटही मिळत होत अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.