रोहतक, 12 फेब्रुवारी : हरियाणाची राजधानी रोहतकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे पाच जणांचा गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात 3 जणं जखमी असून त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पाच मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मीडियाच्या रिपोटनुसार, रोहतक शहरातील जाट कॉलेजात जिम्नॅशियम हॉलमध्ये कोच आणि खेळाडूंवर रात्री गोळीबार करण्यात आला. जाट कॉलेजच्या आखाड्यात सायंकाळी 7 वाजता सोनीपतमधील बरोदा येथे राहणारे कोच सुखविंदर चर्चा करण्यासाठी म्हणून आखाड्यात घुसले. यानंतर आरोपीने गोळीबार सुरू केला. यामध्ये तेथे हजर असलेल्या पाच जणांची हत्या झाली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तर तिघेजण जखमी झाले आहेत. या गुन्ह्यामागे आखाड्यावर हक्क सांगणे आणि कौटुंबीय कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
रोहतक,हरियाणा में जघन्य हत्याकांड।हरियाणा में क़ानून व्यवस्था @mlkhattar @Dchautala की लचर सरकार की तरह हो चुकी है।@police_haryana सिर्फ़ ही सिर्फ़ #किसान व #कर्मचारियों पर लाठी बरसाने वाली है।
— BHUPINDER BHUPI (@BHUPIBOORA) February 12, 2021
ना सरकार ना तन्त्र,
सिर्फ़ है लठतन्त्र। pic.twitter.com/VAhjlA4lIJ
इनकी गई जान साक्षी सतीश पूजा प्रदीप मनोज घायल अमरजीत तीन साल लड़का मात्र भर आखाड्यात झालेल्या या गोळीबारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोच बंदुक घेऊन आखाड्यात कसे आले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. याशिवाय मृत जिम्नॅशिअमच्या खेळाडूंच्या पालकांकडूनही चौकशी करण्याची शक्यता आहे.