उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याआधी शिवसेना नगरसेवकांची राजीनाम्याची धमकी

उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याआधी शिवसेना नगरसेवकांची राजीनाम्याची धमकी

पालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांना या विषयी अंधारात ठेवून त्यांच्या हस्ते भूमिपूजन करुन घेतय असा आरोपही त्यांनी केलाय.

  • Share this:

ठाणे 6 फेब्रुवारी : ठाण्यात खेळाच्या मैदानाचे आरक्षण हटवून त्यांवर सायन्स पार्क उभारले जाणार आहे. या सायन्स पार्कचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार असून जर हे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले तर आम्ही राजीनामा देऊ अशी धमकीच ठाण्यातील चार शिवसेना नगरसेवकांनी दिलीय. त्यामुळे ठाण्यातला मुख्यमंत्र्यांच्या दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे ठाण्यातील 4 नगरसेवक संजय भोईर, देवराम भोईर, उषा भोईर आणि भूषण भोईर यांनी राजीनाम्याची धमकी दिलीय. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून प्रशासन हा प्रकल्प राबविणार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले जाणार आहे. यांत ढोकाळी भागात २० एकर सुविधा भुखंडावर खेळासाठी क्रिडागंणाचे आरक्षण टाकण्याचा प्रस्तावाची सूचना २०१७ मध्ये मंजुर करण्यात आली होती. परंतु असे असतांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता पालिका प्रशासनाने त्याच जागेवर आता सायन्स पार्क अर्बन जंगल उभारण्याचा घाट घातलाय. असा आरोप या नगरसेवकांनी केलाय.

पवारांना टार्गेट करणारा भाजपचा नेता शिवसेनेच्या संपर्कात? CM ठाकरेंची घेतली भेट

पालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांना या विषयी अंधारात ठेवून त्यांच्या हस्ते भूमिपूजन करुन घेतय असा आरोपही त्यांनी केलाय. तर क्लस्टर योजने अंतर्गत हे केलं जात असून काही नगरसेवकांचा गैरसमज झालाय. त्यांनी प्रशासनाशी चर्चा करावी असं ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी स्पष्ट केलंय.

मृत्यूची झुंज अपयशी, औरंगाबाद जळीत प्रकरणातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

या आधी देखील पालिकेच्या या बिल्डर धार्जीणीधोरणामुळे मैदांनाकरता आरक्षित असलेले भू खंड बिल्डरांच्या घशात घातले गेलेत असाही आरोप होतोय. त्यामुळे मुलांसाठी एकही मैदान शिल्लक राहीले नाही असंही म्हटलं जातं. याशिवाय विवीयाना मॉल जवळील फायर स्टेशनसाठी आरक्षित असलेला भुखंडही पालिकेने परस्पर बडया विकासला देऊन टाकल्याचा आरोपही काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केलाय.

First published: February 6, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या