पुणे, 02 सप्टेंबर: बारावीनंतर तंत्रशिक्षणात पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणयासाठी JEE mains ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा सध्या घेण्यात येत आहे. जेईई मेन परीक्षेचं (JEE mains Exam Subvert) चौथं (JEE mains 4th season) सत्र 26, 27 आणि 31 ऑगस्ट आणि 1, 2 सप्टेंबर रोजी घेण्यात आलं . मात्र या परीक्षेमध्ये मोठी अनियमितता (Irregularity in JEE mains exam) आढळून आली आहे. याची चौकशी करत CBI नं आज छापेमारी करत तब्बल 7 जणांना ताब्यात घेतलं आहे.
आज CBI नं पुणे (Pune), दिल्ली (Delhi) आणि NCR च्या काही भागांमध्ये छापेमारी केली आहे. यामध्ये CBI नं 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. परीक्षेमध्ये अनियमितता आणण्यासाठी उमेदवारांकडून तब्बल 15 लाख रुपये घेण्याच्या आरोपाखाली यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
हे वाचा - शस्त्र तस्करी करणारी टोळी गजाआड, मोठा शस्त्रसाठा जप्त
खाजगी शिक्षण संस्था आणि त्याच्या संचालकांकडून चालू असलेल्या JEE Mains 2021 परीक्षेमध्ये अनियमिततेशी संबंधित या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी CBI नं आज पुणे, दिल्ली, जमशेदपूर यांसह देशभरातील विविध शहरांमधील तब्बल वीस जागांवर छापेमारी केली.
7 people detained by CBI for subverting the ongoing #jee2021 exam Were allegedly taking 15 lakh rupees from candidates to help them subvert the exams Raids in delhi , ncr, pune in connection with the case registered by cbi
— Arunima (@Arunima24) September 2, 2021
या शिक्षण संस्थेचे कर्मचारी आणि केंद्र सहकारी हे या परीक्षेमध्ये अनियमितता आणण्यासाठी मदत करत होते. या प्रकरणात एक कंपनी, संचालक आणि तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाचा पुढील तपस पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: CBI, Crime news, Delhi, Entrance exam, Pune