• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • शस्त्र तस्करी करणारी टोळी गजाआड, सांगलीत मोठा शस्त्रसाठा जप्त

शस्त्र तस्करी करणारी टोळी गजाआड, सांगलीत मोठा शस्त्रसाठा जप्त

पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करुन त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

  • Share this:
सांगली, 2 सप्टेंबर : शस्त्र तस्करी करणाऱ्या एका टोळीला मिरज ग्रामीण पोलिसांनी (Miraj Rural Police) अटक केली आहे. पोलिसांनी तिघांना अटक करत तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त (Weapons seized) केले आहेत. शस्त्र तस्करी करण्यासाठी आले असता मिरज पंढरपूर रोडवरील तानंग फाट्या याठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. मिरज ग्रामीण पोलिसांच्याकडून शस्त्र तस्करी करणारी ही टोळी गजाआड करण्यात आली आहे. मिरज-पंढरपूर रोड वरील तानंग फाटा या ठिकाणी काही इसम शस्त्र विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. चार चाकी वाहनाजवळ थांबलेल्या गौस उर्फ निहाल मोमीन (वय 23) राहणार इदगाह माळ, मिरज. सुरेश हत्तेकर (वय 29) रा. सुभाषनगर, मिरज आणि तौफिक शेख (वय 21) रा. इदगाह, मिरज या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. महाराष्ट्रात पुन्हा Lockdown लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं... ही झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सहा जिवंत काडतुसे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक करत त्यांच्या ताब्यातील क्षेत्र व चारचाकी वाहन असा एकूण 3 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या तिघांच्याकडे पिस्तूल कुठून आणली आणि ती कोणाला विक्री करण्यात येत होती याबाबत चौकशी सुरू केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून इतरही गुन्ह्यांचा पर्दाफाश होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.
Published by:Sunil Desale
First published: