VIDEO : पेट्रोल खरेदीसाठी तरुण पोहचला पंपावर; परतला तेव्हा अंगावर कपडेही नव्हते

VIRAL VIDEO: सध्या देशात पेट्रोलचे भाव गगनाला भिडत आहेत. अशात या तरुणाची बिकट अवस्था झाली आहे.

VIRAL VIDEO: सध्या देशात पेट्रोलचे भाव गगनाला भिडत आहेत. अशात या तरुणाची बिकट अवस्था झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 फेब्रुवारी: सध्या देशात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. काही राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे, तर काही राज्यात पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या उबरठ्यावर आहेत. यामुळे देशातील विरोध पक्षाने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर देशात अनेक ठिकाणी इंधन भाववाढीविरोधात छोटी मोठी आंदोलनं झाली आहेत. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर इंधन भाववाढीवरून अनेक मिम्स बनले आहेत. जे सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल होतं आहेत. पेट्रोलच्या भाववाढीवरून लोकांनी अनेक व्हिडिओ बनवले आहेत. अलीकडेचं कॉमेडीन श्याम रंगीलाने इंधन दरवाढीवर व्हिडिओ बनवला होता. जो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर संबंधित पेट्रोल पंप चालकाने श्याम रंगीला विरोधात कारवाई करण्याची धमकी देखील दिली होती. आता असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. जे नेटकऱ्यांचं मनोरंजन करण्यासोबत इंधन दरवाढीवर खोचक भाष्य करत आहेत. संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक तरुण नेहमीप्रमाणे पेट्रोल भरायला गेला आहे. ज्यामध्ये पेट्रोल भरायला जाताना त्याचा पोषाख एकदम व्यवस्थित आहे. मात्र जेव्हा तो पेट्रोल भरून परत येतो. तेव्हा त्याच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही. शिवाय त्यांच्या अंगावरील सर्व कपडेही गायब झाले आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओला आतापर्यंत 88 हजाराहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे.
  हे ही वाचा-चालायचा कंटाळा म्हणून शॉर्टकट घेतला आणि भररस्त्यात झाली फजिती; पाहा VIDEO तर दुसरीकडे पेट्रोल दरवाढीवर कटाक्ष टाकणारा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये त्याने बजाज फिनसर्वचं कार्ड देवून  EMI पद्धतीने पेट्रोल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होतं आहे. यावर लोकांनी मजेदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
  त्याचा हा व्हिडिओ लाखो नेटकऱ्यांनी पाहिला असून 2 लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: