SexyBack वर नाचणाऱ्या या डॉक्टरांनी 9 दिवसांत केल्या 130 डिलिव्हरी, मग झालं अस्सं सेलिब्रेशन, पाहा VIDEO

SexyBack वर नाचणाऱ्या या डॉक्टरांनी 9 दिवसांत केल्या 130 डिलिव्हरी, मग झालं अस्सं सेलिब्रेशन, पाहा VIDEO

Lady Doctor Dancing Video: डॉक्टर्सची कल्पना आपण कायम एकाच रुपात करतो. या डान्सिंग डॉक्टर्सला पाहून तुम्ही खुश व्हाल.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : सोशल मीडियावर कितीतरी मजेदार गोष्टी रोज व्हायरल होत असतात. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबाबतच्या या गोष्टी सामान्य माणसांनी पाहिल्यावर त्याला मोठाच आनंद मिळतो. (social media viral video of doctors)

पोलीस, वकील, शेफ, सैन्यदलातील जवान अशा अनेकांच्या या गोष्टी असतात. आता असाच एक डॉक्टर्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ लेडी डॉक्टर्सचा आहे. (lady doctors dancing)

या व्हिडिओत आपल्याला या लेडी डॉक्टर्स चक्क नाचताना दिसतात. नाईट शिफ्टदरम्यान या लेडी डॉक्टर्सनी मस्त डान्स केला आहे. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूपच आवडतो आहे. लोक डॉक्टर्सचं कौतुक करत आहेत. (lady doctors dancing in night shift)

हा व्हिडिओ मँगलोरचा आहे. यात 6 स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर्स एका इंग्रजी गाण्यावर धमाल नृत्य करत आहेत. जस्टिन टिम्बरलेकच्या सेक्सी बॅक गाण्यावरचा हा डान्स एकदम एनर्जेटिक आहे. (lady doctors dancing in night shift on Justin Timberlake song)

या व्हिडिओला वरिष्ठ चिकित्सक डॉ. नीलाश्मा सिंघल ( Dr. Neelashma Singhel viral dance video) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात सगळ्या डॉक्टर्स रंगीत स्क्रब घातलेल्या दिसतात. त्यांच्या गळ्यात स्टेथास्कोप आहे. सगळ्या एक वर्तूळ बनवून डान्स करत आहेत. डान्स करताना सगळ्याजणी खूपच आनंदी दिसत आहेत.

या व्हिडिओत डॉक्टर सिंघल या सगळ्यात वरिष्ठ आहेत. त्यांनी जांभळ्या रंगाचा स्क्रब घातला आहे. दोन जणी सिंघल यांच्या ज्युनियर आहेत. बाकी तीन हे इंटर्न्स आहेत. या सगळ्यांना टॅग करत डॉ. सिंघल यांनी लिहिलं आहे, 'माय टॅलेंटेड इंटर्न्स' आणि 'मेरी प्यारी ज्युनियर्स'

हे ही वाचा ..अन् आईनं निर्जीव वस्तूतही आणला जीव, सोशल मीडियावर होतीये 'या' गजऱ्याची चर्चा

आपल्या कॅप्शनमध्ये सिंघल यांनी हेसुद्धा सांगितलं, की त्यांच्या टीमनं केवळ 9 दिवसात 130 डिलिव्हरीज केल्या आहेत. आणि आम्ही हे सेलिब्रेट करत आहोत. लोक या सगळ्या टीमचं त्यांच्या कर्तव्यनिष्ठेसह क्रिएटिव्ह डान्सिंग स्किलसाठीही कौतुक करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: February 27, 2021, 9:17 PM IST

ताज्या बातम्या