मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Big News :...तर मराठा समाजासाठी नवा पक्ष स्थापन करणार, आक्रमक छत्रपती संभाजीराजांचे संकेत

Big News :...तर मराठा समाजासाठी नवा पक्ष स्थापन करणार, आक्रमक छत्रपती संभाजीराजांचे संकेत

'माझा मान-सन्मान गेला खड्ड्यात, 70 टक्के मराठा समाजासाठी एकत्र या, सर्वांनी एकत्र यावं ही हात जोडून विनंती'

'माझा मान-सन्मान गेला खड्ड्यात, 70 टक्के मराठा समाजासाठी एकत्र या, सर्वांनी एकत्र यावं ही हात जोडून विनंती'

'माझा मान-सन्मान गेला खड्ड्यात, 70 टक्के मराठा समाजासाठी एकत्र या, सर्वांनी एकत्र यावं ही हात जोडून विनंती'

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 28 मे : मराठा आरक्षणावरुन आक्रमक झालेल्या संभाजी राजांनी (MP Sambhaji Raje) राज्य सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे. दरम्यान आज पत्रकार परिषद घेत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संभाजी राजे महाराष्ट्र दौरा करीत आहे. यावेळी त्यांनी अनेक बड्या नेत्यांबरोबरच कायदेतज्ज्ञांचीही भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीराजे हे नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असून ते लवकरच भाजपमध्ये पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत संभाजीराजेंनी तसे संकेतही दिले आहेत. बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष स्थापन करण्याची विचार करू अशी मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी संभाजीराजे हे नवा पक्ष किंवा संस्था स्थापन करू शकतात. इतकंच नाहीतर ते मराठा सोडून ते बहुजन समाजाला एकत्र आणत आरक्षणाचा मुद्दा लावून धरू शकतात. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केलं आहे.

हे ही वाचा-6 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करा अन्यथा रायगडावरून आंदोलनाला सुरूवात

संभाजी राजेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- 70 टक्के मराठा समाजासाठी एकत्र या, सर्वांनी एकत्र यावं ही हात जोडून विनंती

- यात माझं राजकीय सामाजिक नुकसान होणार आहे. मात्र मी मराठा समाजासाठी उभा आहे.

- मी नुसतं मराठ्यांचं नाही तर बहुजनांचं नेतृत्व करतो.

- मी सगळ्यांना अंगावर घेतलंय, ज्यामुळं माझं सामाजिक आणि राजकीय नुकसान होणार आहे. पण मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारसरणीसाठी मी समोर आलोय - छत्रपती संभाजीराजेंची प्रथमच कबुली

- आरक्षणासाठी दोन दिवसांचं अधिवेशन घ्यावं, संभाजी राजेंची मागणी

- दिल्लीत गोलमेज परिषद घेणार

- आरक्षणासाठी दिल्लीत खासदारांची परिषद घेणार

- सारथीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे, सारथीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी

- ओबीसी मध्ये नवीन प्रवर्ग तयार करता येऊ शकते का हे पूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी, शरद पवाराांनी स्पष्ट करावं

- तिसरा पर्याय 342 ए च्या माध्यमातून आपला प्रस्ताव केंद्राकडू मांडू शकता. या माध्यमातून आपल प्रपोजल राज्यपालांसमोर मांडावे केंद्रा पुढे मांडा गायकवाड अहवालातील तृटी दुर करा. राष्ट्रपतींकडे विषय सादर करावा आयोग स्थापन करा

First published:

Tags: Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati, संभाजीराजे