ठाणे, 28 मे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या इंधनाच्या दरांमुळं (Fuel price hike) अखेर अनेक ठिकाणी पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाण्यात पोस्टर (Poster in Thane) लावत अनोखा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) संपूर्ण शहरभरात लावलेल्या या पोस्टवर अच्छे दिनच्या हार्दिक शुभेच्छा (Acche Din) देत इंधन दरानं शंभरी ओलांडल्यानं जणू मोदी सरकारला मॅन ऑफ द मॅच (Man of the Match) ठरवलं आहे.
(वाचा-6 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करा अन्यथा रायगडावरून आंदोलनाला सुरूवात)
देशात पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये महिन्यातील 4 तारखेनंतर चौदावी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ठाणे-मुंबईत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. डीझेलच्या दरातही 29 पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. ठाणे- मुंबईत पेट्रोल शुक्रवारी 100.4 रुपये प्रतिलीटर आणि डिझेस 91.87 रुपये प्रति लिटर आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं संपूर्ण ठाण्यामध्ये फलक लावले आहेत. या फलकावर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचं नमूद केलं आहे. मॅन ऑफ दि मॅच पेट्रोल 100 नॉट आऊट आणि त्याखाली अच्छे दिनाच्या शुभेच्छा असं लिहित केंद्र सरकार आणि भाजपला टोला या माध्यमातून लगावला आहे.
(वाचा-मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी संभाजीराजेंनी सांगितले 'हे' 4 पर्याय)
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं लावलेल्या या फलकांची ठाणे शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष खासदार आनंद परांजपे यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गेले काही दिवस सातत्याने इंधनाचे दर वाढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीचा निषेध करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध ठाणे शहरात फलक लावले आहेत. त्यावर एक बॅट्समॅनचे चित्र आहे. त्याला आम्ही मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार दिला आहे. त्यावर शंभरी पार केल्याबद्दल अच्छे दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते बहुत हुई महँगाई की मार, अब की बार मोदी सरकार असं ओरडत होते. मात्र, आता त्यांच्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक झाला आहे. यूपीएच्या काळात पट्रोल-डिझेल कधीच एवढ महाग झाले नव्हते. त्यामुळेच केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत, असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol and diesel price, Thane