Home /News /national /

भयंकर! घरी परतण्यासाठी घेतला अंधश्रद्धेचा आधार, देवीसमोर कापली स्वत:चीच जीभ

भयंकर! घरी परतण्यासाठी घेतला अंधश्रद्धेचा आधार, देवीसमोर कापली स्वत:चीच जीभ

मध्य प्रदेशमधून कामानिमित्त गुजरातमध्ये आलेल्या एका शिल्पकाराने (Migrant Sculptor) बनासकांठा जिल्ह्यात असणाऱ्या देवीच्या मंदिरात अंधश्रद्धेपोटी त्याची जीभ कापली आहे.

    पालनपूर (गुजरात), 20 एप्रिल : मध्य प्रदेशमधून कामानिमित्त गुजरातमध्ये आलेल्या एका शिल्पकाराने (Migrant Sculptor) बनासकांठा जिल्ह्यात असणाऱ्या देवीच्या मंदिरात अंधश्रद्धेपोटी त्याची जीभ कापली आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे (Coronavirus Lockdown) त्रस्त या तरूणाला घरी जाण्याची इच्छा होती. तपासाअंती पोलिसांसमोर आलेली माहिती अत्यंत भयावह आहे. कोरोना व्हायरस निघून जावा याकरता या तरूणाने देवीसमोर त्याग करण्यासाठी त्याने जीभ कापून घेतली. (हे वाचा-कोरोनामुळे अगणित आर्थिक नुकसान! 3 मेपर्यंत GoAirचे 90% कर्मचारी बिनपगारी रजेवर) या अवघ्या 24 वर्षांच्या तरूणाचे नाव विवेक शर्मा असून तो मध्य प्रदेशातील मुरैना या जिल्ह्यातील आहे. शनिवारी हा तरूण सुईगाम तालुक्यातील नादेश्वरी गावातील नादेश्वरी देवीच्या मंदिरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक एचडी परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार तो जीभ हातमध्ये पकडून बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळून आला. त्याला त्वरीत सुईगाममधील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. (हे वाचा-बहिणीचे अंत्यसंस्कार करून भावाचं कर्तव्य पार पाडलं, नंतर ड्युटीवर परतला पोलीस) ज्या देवळात ही घटना घडली त्या देवळाची सुरक्षा 'बीएसएफ'च्या हातामध्ये होती. त्या मंदिरापासून 14 किलोमीटर दूर असणाऱ्या एका मंदिरात विवेक काम करायचा. लॉकडाऊनमुळे त्याचं काम तर थांबलच पण तिथेच अडकून राहायला झालं होतं. परिणामी घरच्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. बीएसएफच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने देवीसमोर काहीतरी त्याग करण्यासाठी स्वत:ची जीभ कापून घेतली, जेणेकरून कोरोनाचे हे संकट दूर होईल. मात्र पोलिसांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत विवेक शुद्धीवर येऊन घडला प्रकार सांगत नाही तोपर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही गोष्टीबाबत बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या