एकीकडे प्रियांका चोप्राचा दीर जो जोनस आणि सोफी टर्नरच्या सरप्राइझ वेडिंगची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे तिच्या भावाचं लग्न मात्र मोडल्याची माहिती समोर आली आली आहे. प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी प्रसारमाध्यमांना याविषयी माहिती दिली.
27 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि इशिताचा साखरपुडा झाला होता. मधु चोप्रा म्हणाल्या, 'इशिता आणि सिद्धार्थनं एकमेकांच्या संमतीनंच लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.' पण यामागचं नेमक कारण काय हे विचारल्यावर मात्र मधु चोप्रा यांनी याचं उत्तर देणं टाळलं.
काही दिवसांपूर्वी प्रियांका आपल्या भावाच्या लग्नासाठी मुंबईमध्ये आली होती. पण काही कारणानं हे लग्न पुढे ढकलल्यानं ती पुन्हा अमेरिकेला परतली. त्यावेळी सिद्धार्थची होणारी पत्नी इशिता कुमारची सर्जरी असल्यानं हे लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात येत होतं.
पण त्यानंतर इशिता आणि सिद्धार्थमध्ये सर्वकाही ठीक नसल्यानं हे लग्न मोडल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण दोन्ही कुटुंबांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. पण आता प्रियांकाच्या आईनंच सिद्धार्थचं लग्न मोडल्याच्या वृत्ताला दुजारा दिला.
काही दिवसांपूर्वी इशितानं हॉस्पिटल मधील काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर गुरुवारी (2 मे) तिनं रेस्ट्रो बारमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याला "Cheers to new beginnings. With a goodbye kiss to beautiful endings." असं कॅप्शन दिलं. होतं ज्यावर तिच्या आईची, 'जुनं पुस्तक बंद कर आणि नवी कथा लिहायला सुरुवात कर' अशी कमेंट पाहायला मिळाली.
याशिवाय इशितानं तिच्या इन्स्टाग्रमवरील तिच्या आणि सिद्धार्थच्या साखरपुड्याचे सर्व फोटो डिलिट केले आहे. तसेच सिद्धार्थसोबत असलेले तिचे फोटोसुद्धा तिनं तिच्या अकाउंटवरून हटवले आहेत.
अशाप्रकारे ठरलेलं लग्न मोडण्याची चोप्रा कुटुंबीयांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2014मध्ये सिद्धार्थचा साखरपुडा कनिका माथूर हिच्या सोबत झाला होता. त्यांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगही प्लान केलं होतं पण त्यांचं लग्न काही कारणानं मोडलं होतं.