मुंबई 11 जुलै: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) खूप कमी काळात आघाडीचा कलाकार बनला आहे. त्याच्या काही प्रोजेक्ट्सशी निगडित बऱ्याच बातम्या समोर येताना दिसत असल्या तरी त्याचं फॅन फॉलोईंग मात्र जबरदस्त वाढताना दिसत आहे. त्याच्या भूलभुलैया 2 (Bhulbhulaiyya 2) या सिनेमाने आज यशस्वीरीत्या पन्नास दिवस पूर्ण केल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वर्षात तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेला अभिनेता सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत येताना दिसत आहे. एका बड्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत त्याची वेगळीच धमाल चाललेली दिसून येत आहे. हा अभिनेता म्हणजे तरुणाईचा आणखीन एक फेव्हरेट हिरो (Ayushmann Khurrana) आयुष्मान खुराना. आयुष्मान अर्धनग्न अवस्थेत कार्तिकच्या खोलीत गेला असल्याच्या चर्चांना सध्या उधाण येताना दिसत आहे. पण याबद्दल एक खुलासा झाला आहे. हे दोन्ही आघाडीचे अभिनेते खरंच एकमेकांच्या खोलीत गेले नसून हा सगळं प्रकार आयुष्मानने शेअर केलेल्या नव्या फोटोमुळे होत आहे. अभिनेता आयुषमान खुरानाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात तो अर्धनग्न अवस्थेत फक्त टॉवेल गुंडाळलेला दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे, ‘ओळखा मी कुठे आहे, (फक्त चुकीचं उत्तरं द्यावी)’. या पोस्टवर सध्या कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. अनेक मोठमोठ्या बॉलिवूड स्टार्सने त्याच्या या फोटोवर भन्नाट उत्तरं दिली आहेत. त्यातच अभिनेता कार्तिक आर्यनने या फोटोवर अफलातून कमेंट केली आहे. तो लिहितो , “माझ्या खोलीत”. हे ही वाचा- Sai Pallavi: लव्ह लेटरमुळे साई पल्लवीनं खाल्ला होता पालकांचा बेदम मार, काय आहे नेमकं प्रकरण? “कार्तिकच्या अशा कमेंटने हशा पिकवल्याचं दिसून येत आहे. तर त्यावर अनेकांनी रिऍक्ट होत बरेच प्रश्न सुद्धा केले आहेत. हे दोन अभिनेते खोलीत एकत्र काय करत आहेत इथपासून ते (Kartik Aryan Dostana 2) दोस्ताना 2 चं शूटिंग करत आहेत का असे प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत.
कार्तिक आर्यन आणि दोस्ताना सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं एक अजब नातं आहे. या सिनेमातून कार्तिकची हाकालपट्टी करण्यात आली असल्याचं मागच्या कळत समोर आलं होतं. त्यानंतर धर्मा प्रॉडक्शनशी असलेलं कार्तिकचं नातं सुद्धा तणावपूर्ण झालं असल्याचं समजत होतं. कार्तिक आणि करण जोहर यांच्यात सुद्धा बराच तणाव चालू आहे अशी माहिती समोर येत होती. सध्या तरी कार्तिकच्या या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.