परभणी, 23 ऑगस्ट : राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू असली तरी कोरोनाचं संकटं काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. कोरोना या जीवघेण्या संसर्गाचा शिरकाव हा अनेक राजकीय नेते आणि दिग्गजांवरही झाला आहे. आताही भाजपच्या महिला आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. जिंतूरच्या भाजप आमदार, मेघना बोर्डीकर साकोरे यांना कोरोणाची लागण झाली असून, मेघना बोर्डीकर यांच्या सोबत, घरातील अन्य 5 व्यक्ती ही कोरणा पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर पुणे इथे उपचार सुरू करण्यात आले आहेत. आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. पुण्यात गणपती विसर्जनाचे हाल, भक्तांनी नजर चुकवून दिला बाप्पाला अखेरचा निरोप मिळालेल्या माहितीनुसार, सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आलं आहे. मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार आहेत. ही त्यांची पहिलीच टर्म आहे. मागील आठवड्यामध्ये, काही कामानिमित्त मेघना बोर्डीकर या मुंबई इथे गेल्या होत्या, त्यानंतर त्या पुणे इथल्या निवासस्थानीच होत्या. पती प्रेयसीसोबत बेडरूममध्येच राहायचा, वैतागून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल या दरम्यान, त्यांची प्रकृती खालवली. कोरोनाची लक्षण दिसल्यामुळे त्यांनी चाचणी केली. त्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर तातडीने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची ही कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी पाचही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, सर्वांवरच पुणे इथं उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाही मोडू शकला नाही दगडूशेठ बाप्पाची 34 वर्षांची परंपरा, असा झाला कार्यक्रम मेघना यांनी परभणी ते मुंबई आणि त्यानंतर पुणे असा प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना वेळीत चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर कोण-कोण संपर्कात आलं होतं याचाही तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.