कोरोनाही मोडू शकला नाही दगडूशेठ बाप्पाची 34 वर्षांची परंपरा, अशी पार पडली मंगलमय प्रथा

कोरोनाही मोडू शकला नाही दगडूशेठ बाप्पाची 34 वर्षांची परंपरा, अशी पार पडली मंगलमय प्रथा

नेक गणेश मंडळांनी आणि मानाच्या गणपती मंडळांनी कित्येक वर्षांची परंपरा मोडत साधेपणाने बाप्पाची स्थापना केली.

  • Share this:

पुणे, 23 ऑगस्ट : कोरोनाच्या संकटामुळे देशभरात मोठ्या उत्सवात साजरा होणारा गणेशोत्सव साधेपणा साजरा होत आहे. अनेक गणेश मंडळांनी आणि मानाच्या गणपती मंडळांनी कित्येक वर्षांची परंपरा मोडत साधेपणाने बाप्पाची स्थापना केली. पण या सगळ्यात सार्वजनिक प्रकारे कार्यक्रम करता येत नसला तरी 'दगडूशेठ' गणपतीची 34 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा मोडली जाणार नाहीये.

'ओम नमस्ते गणपतये' चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर यंदा देखील निनादले जात आहेत. एरवी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या 5 महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 128व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या 5 महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग 10 वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचे 34 वे वर्ष आहे.

मुंबईत आज दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, विसर्जनाआधी वाचा 'या' नव्या अटी

अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी 6 वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष सादर केले. तसेच गणेशाची आरती देखील करण्यात आली.

उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरा बाहेरून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 23, 2020, 9:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading