Home /News /news /

'उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता', नारायण राणेंचा जहरी टीका

'उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता', नारायण राणेंचा जहरी टीका

जी पावलं आता टाकत आहेत. तशा बैठकी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वा उद्धव ठाकरेंनी का नाही घेतल्या ?असा सवाल देखील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे राज्यभर वातावरण तापलं आहे. अशात विरोधकांनीही ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदासीनतेमुळे मराठा समाजाला आरक्षणाला मुकावे लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता. मी शिवसैनिक आहे त्यामुळे मला माहित आहे.' अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. जी पावलं आता टाकत आहेत. तशा बैठकी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वा उद्धव ठाकरेंनी का नाही घेतल्या ?असा सवाल देखील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. खरंतर मराठा आरक्षणाच्या मुद्दायवरून आज राज्यभर आंदोलन केलं जात आहे. अशात ठाकरे सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतल्यामुळे मराठा समाज आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 'भाभीजीचे पापड खाऊन कोरोना रुग्ण बरे झाले का?' संजय राऊतांची टीका खरंतर, मराठा आरक्षणावर स्थगिती आणताच पोलीस भरती काढल्यामुळे राजकीय वर्तुळात नाना प्रकारच्या टीका टिपण्या सुरू आहेत. राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती झाली आहे. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ही मेगा भरती का करण्यात आली असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला आहेत. इतकंच नाही तर हा आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जळजळीत टीका नितेश राणे यांनी केली आहे. सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा, छत्रपती संभाजी राजेंची टीका यासंबंधी त्यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे ज्यामध्ये असं लिहलं की, 'जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??' असा थेट सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, सरकारच्या या मेगा भरती निर्णयावर राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारवर टीका केली आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Maratha reservation

पुढील बातम्या