मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /राज ठाकरेंच्या मनात चाललंय काय? काल मुख्यमंत्र्यांची तर आज भाजप नेत्याची भेट!

राज ठाकरेंच्या मनात चाललंय काय? काल मुख्यमंत्र्यांची तर आज भाजप नेत्याची भेट!

राज ठाकरे यांनी शनिवारीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची भेट घेतली होती

राज ठाकरे यांनी शनिवारीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती

राज ठाकरे यांनी शनिवारीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 ऑक्टोबर : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि शिंदे सरकारमध्ये जवळीक वाढत चालली आहे. शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी भेट घेतली. बीसीसीआय खजिनदार झाल्यानंतर आशिष शेलार यांनी पहिल्यांदाच राज ठाकरे यांची भेट घेतली. भाजपकडून मुंबई महापालिकेची जबाबदारी आशिष शेलारांवर दिली आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ही भेट महत्वाची आहे.

(...आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले 'वर्षा' बंगल्यावर)

दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीथेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

'तुमचे आमदार फुटले तुम्हाला सहानभूती, तुम्ही मुख्यमंत्री पद गमावलं तुम्हाला सहानभूती, तुमचं चिन्ह गेलं तुम्हाला सहानभूती ठीक आहे पण आम्ही गेली 25 वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय. आम्हाला सहानभूती कधी मिळणार? 25 वर्ष मुंबईची तुंबई होतेय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

('मुख्यमंत्री राज ठाकरे..'; एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीनंतर मनसे नेत्याचं ट्विट)

'कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला? कोरोना काळात लपून बसलात त्याची की, पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची?महापौरांच्या मुलाला कोरोना काळात कंत्राट दिलं त्याची सहानभूती पाहिजे की, लोकांचे कोरोनामध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पब ना परवानगी दिलीत त्याची सहानभूती पाहिजे? कोरोनामध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता त्याची सहानभूती पाहिजे की सामान्य माणसाला हॉस्पिटल्स नि बिला मध्ये लुटलं त्याची सहानभूती पाहिजे? असा सवालच देशपांडेंनी विचारला.

First published:

Tags: Maharashtra News, Marathi news, Raj thackarey