पुणे, 25 जुलै : राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात यापुढे सरसकट लॉकडाऊन होणार नसलं तरी वीकेंड लॉकडाऊनच्या प्रस्तावार गांभिर्याने विचार सुरू असून त्यासोबतच प्रशासन काही अभिनव उपक्रमही राबवले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती जिल्हाधिकारीन नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यात विकेंड लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना ही माहिती दिली आहे. तसंच पुण्यातील 10 दिवसांच्या लॉकडाऊनचे येत्या काही दिवसात नक्कीच सकारात्मक परिणाम दिसतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. बिबवेवाडी भागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कामगार कोविड हॉस्पीटलची आज त्यांनी पाहणी केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आता पाकिस्तानही बनवणार जीवघेणा व्हायरस, चीनशी झाला गुप्त करार पुण्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. पुण्यात 13 ते 23 जुलै 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात आला तरी देखील कोरोना आटोक्यात आला नाही. धक्कादायक म्हणजे कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित झाला आहे. तीन सहायक आरोग्य अधिकारी पॉजिटिव्ह आढळले आहेत. पुणे महापालिकेत आतापर्यंत 313 कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. त्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, महापौरांसह 168 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत तर 132 कर्मचारी सध्या उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 13 जणांची मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन संपताच समोर आली मोठी आकडेवारी… पुण्यात लॉकडाऊन गुरुवारी संपला. पण आता लॉकडाऊन संपल्या संपल्या धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 10 दिवस लादलेल्या लॉकडाऊनमध्ये नेमकं काय झालं? खरंच प्रशासनाला संसर्गाची साखळी तोडण्यात यश आलंय का? रूग्णसंख्येवर आवर घालण शक्य झालंय का? या सगळ्या प्रश्नाची उत्तर नाही अशी आहेत. उदयनराजेंच्या शपथविधी वादानंतर राज्यपालांनी थेट उपराष्ट्रपतींना लिहिलं पत्र लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या 9409 होती. तर 874 मृतांचा आकडा होता. 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ॲक्टिव्ह रूग्णसंख्या तब्बल 17,056 आणि 1104 मृत्यू झाले. त्यामुळे आकडे वाढायचे थांबत नाही. दरम्यान, रुग्णवाढीमुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. ते 16 ते 21 जुलै दरम्यान 45.9 टक्क्यांवर आले आहे. हेच प्रमाण 9 ते 15 जुलै दरम्यान 71.9 टक्के इतकं होतं तर 2 ते 8 जुलै दरम्यान 65.3 टक्के होतं. मात्र पूर्ण जिल्ह्याचा विचार करता मृत्यू दर कमी झाला आणि देशाचा,राज्याचा, मुंबईचा विचार करता सर्वात कमी मृत्यू दर पुण्याचा आहे. देशातील मृत्यू दर 2.41आहे तर पुणे जिल्ह्याचा 2.35 आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.